आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आकाशात रंगले काटाकाटीचे युद्ध

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - मकरसंक्रांतीचा सण मुले व त्यांच्या पालकांनी पतंग उडवून साजरा केला. सुवासिनीनी पारंपरिक पद्धतीने पूजा करून आवा लुटला. दर्शनासाठी विठ्ठल मंदिरात मोठी गर्दी झाली होती.
संक्रांतीपासून रात्रीचा अवधी कमी होऊन दिवस तीळ, तीळ वाढत जातो. थंडी कमी होते. परस्परांना तीळगूळ देऊन स्नेहाचे बंधन दृढ करण्याचा हा सण नगरमध्ये उत्साहात साजरा झाला. संक्रांत म्हणजे पतंग महोत्सवही असतो. पतंगशौकिनांनी एक महिन्यापासून पतंग उडवायची तयारी केली होती. काहींनी घरीच पतंग व मांजा तयार केला होता, तर काहींनी रेडिमेडवर आपली हौस भागवली. सकाळपासून आकाशात पतंग दिसू लागले होते. दुपारनंतर पतंगांची गर्दी वाढून काटाकाटी सुरू झाली. काही ठिकाणी गच्चीवर सीडी प्लेअर लावून गाण्यांच्या साथीने पतंग उडवले जात होते. विविध रंगछटांच्या, विविध आकारांच्या पतंगांचे युद्ध सायंकाळी उशिरापर्यंत रंगले होते. घरोघरी गुळाच्या पोळ्यांचा बेत होता. शहरातील माळीवाडा, दिल्ली दरवाजा, दाळमंडई येथील विठ्ठल मंदिरात सवाशिणींनी ओवसण्यासाठी गर्दी केली होती. सायंकाळी लहान-थोरांनी एकमेकांना तीळगूळ देऊन शुभेच्छा दिल्या.