आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुसते बघू नका, सामील व्हा... (मकरंद अनासपूरे यांचे पत्र)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळीनं भरलेल्या रस्त्यावरून जाणाऱ्या, कुंडीतील कचऱ्यानं हैराण होत नाक दाबून बुक्क्यांचा मारा सहन करणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेला तुमच्या मक्याचा सप्रेम नमस्कार. मंडळी, तुमच्या अलोट प्रेमामुळे मी सिनेमासृष्टीत पोहोचलो. स्थिरावलो. तुम्हा सर्वांचे मनोरंजन करण्याची जबाबदारीही पार पाडत आहे. मात्र, चार घटका करमणुकीसोबत तुमच्या सुख-दु:खात सहभागी होणे. चार गोष्टी महत्त्वाच्या सांगणे हे मराठमोळा माणूस म्हणून सांगणे माझे कर्तव्यच आहे. कार्यक्रमांच्या निमित्ताने मी फिरत असतो. कधी अहमदनगर भेटीचा प्रसंग येतो.
प्रत्येक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे पाहून परेशान होऊन जातो. या शहरात येणारी देश-विदेशांतील माणसे जागोजागी साठलेला कचरा, तुंबलेली गटारे पाहून काय म्हणत असतील? कुणी म्हणेल की, सफाई मनपाचे काम आहे. पण जेमतेम १०००-१२०० लोक कचरा उचलणार आणि लाखो लोक कुंडीच्या बाहेर, रस्त्यावर किंवा दिसेल त्या ठिकाणी कचरा टाकणार. मग काय होणार? हे शहर आपल्या सर्वांचेच आहे. त्याची सफाई करण्यासाठी तुमच्या मदतीची जोड मिळाली, तर पाहता पाहता आपले शहर लखलखीत होऊन जाईल. बरं, त्यासाठी तुम्हाला फार कष्ट करण्याची गरज नाही. फक्त "दिव्य मराठी'च्या महास्वच्छता अभियानात सहभागी व्हायचं आणि रस्त्यावर कचरा टाकणार नाही, दुसऱ्या कुणाला टाकू देणार नाही, एवढाच संकल्प करायचा आणि तो अंमलात आणण्यासाठी कायम तत्पर राहायचे. आपण सारे मिळून एक चांगला बदल आपल्या शहरात घडवूया.