आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Make Plan For Polution Free Sina River District Collector Kawade Order

सीना नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी दीर्घकालीन उपाययोजना करा, जिल्हाधिकारी कवडे यांचे आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - कचरानिर्मूलन ही गंभीर समस्या आहे. त्यासाठी प्रबोधन कृती महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयात पर्यावरण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. उपजिल्हाधिकी डी.एम.बोरुडे, मनपा उपायुक्त भालचंद्र बेहरे, उपवनसंरक्षक जी. डी. वळसे, उपसंचालक आर. के. गायकवाड, शिक्षणाधिकारी अशोक कडूस. प्रशासन अधिकारी नितीन कापडणीस, अर्जून गायकवाड, बी.एस. खेडकर, डॉ. एस. बी. राजूरकर, डॉ. डी. व्ही सांळुके, डी. एल. खेडकर, डॉ. एस. बी. राजूरकर, पी. एन. कातकडे, सतीश भामरे, सी. पी. काळे आदी उपस्थित होते. कवडे म्हणाले, नगरपालिका, महानगरपालिकांनी कचरा निर्मूलनाबाबत सकारात्मक प्रयत्न केले, तरच ही समस्या कमी होईल. सीना नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी दीर्घकालीन उपाययोजना करणे आवश्यक आहे. या उपाययोजनाबाबत सूचना दिल्या असतानाही काही कार्यवाही झालेली नाही.त्याबद्दल कवडे यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले,महापालिका हद्दीतील तसेच जिल्हातील प्लॅस्टिक पिशव्या वापरण्यास बंदी असताना त्याबाबत कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. प्रशासकीय यंत्रणेने याबाबत तळमळीने कारवाई केली पाहिजे. इच्छाशक्ती असली तरच प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर नियंत्रण बसू शकते. जिल्ह्यात चालू असलेल्या कत्तलखान्याबाबत त्यापासून होणाऱ्या प्रदूषणाबाबत मनपा, नगरपालिका हद्दीत काय स्थिती आहे, हे कत्तलखान्यांना परवानगीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत. यासाठी पुर्तता करण्याचे आदेश त्यांनी दिले. कारखान्यांद्वारे होणारे दूषित पाणी नद्यांमध्ये सोडण्यात येते. त्याला आळा घालण्यासाठी प्रदूषण नियंत्रण जलसंधारण विभागाने कार्यवाही करावी,असे आदेश त्यांनी दिले.