आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Making Engine In Nagar Use In Non Man Helicoptor

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नगरमध्ये बनवलेल्या इंजिनाची मानवरहित विमानात यशस्वी चाचणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- लष्कराच्या येथील ‘वाहन अनुसंधान तथा विकास आस्थापना’ (व्हीआरडीई) संस्थेत तयार केलेल्या रोटरी इंजिनाची मानवरहित विमान ‘निशांत’मधील चाचणी यशस्वी चाचणी झाली. कर्नाटकातील कोलार येथे 22 व 24 जानेवारीला या चाचण्या झाल्या. तीन तासांपेक्षा अधिक काळ या इंजिनाने आपली क्षमता सिद्ध केली. त्यामुळे ‘व्हीआरडीई’च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

मानवरहित विमानासाठी तयार करण्यात आलेले हे पहिलेच संपूर्ण भारतीय बनावटीचे इंजिन आहे. 30 किलो वजन असलेल्या या इंजिनाची क्षमता 55 हॉर्सपॉवर आहे. संरक्षण मंत्रालयाच्या ‘रक्षा अनुसंधान तथा विकास संघटन’चा भाग असलेल्या येथील ‘व्हीआरडीई’तील तंत्रज्ञांनी अथक परिश्रम घेऊन हे इंजिन तयार केले. या इंजिनाने चाचणीदरम्यान ‘निशांत’ या मानवरहित विमानाला समुद्रसपाटीपासून 3700 मीटर उंचीपर्यंत अतिशय सहजपणे नेले. अपेक्षित सर्व चाचण्या इंजिनाने लीलया पार करीत आपली क्षमता सिद्ध केली. हे इंजिन तयार करणा-या पथकामध्ये मराठी तंत्रज्ञांचा मोलाचा वाटा आहे. व्हीआरडीईचे संचालक मनमोहनसिंग यांनी हे इंजिन तयार
करणा-या पथकाचे प्रमुख तंत्रज्ञ डी. राधाकृष्णन व इतरांचे अभिनंदन केले.