आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपूर्ण जिल्हा कुपोषणमुक्त करण्याचा संकल्प करा- विठ्ठल लंघे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- कुपोषणमुक्तीत जिल्हा राज्यात तिसरा आहे. आता संपूर्ण जिल्हा कुपोषणमुक्त करण्याचा संकल्प करा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठल लंघे यांनी रविवारी केले.
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमात आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका व मदतनीस यांना जिल्हा परिषदेतर्फे पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी लंघे बोलत होते. उपाध्यक्ष मोनिका राजळे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती हर्षदा काकडे, सभापती शाहूराव घुटे, बाबासाहेब तांबे, राहुरी पंचायत समितीचे सभापती शिवाजी गाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल या वेळी उपस्थित होते.
कुपोषणमुक्तीत पर्यवेक्षिका, सेविका व मदतनिसांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्याच मदतीने राजमाता जिजाऊ आरोग्य व पोषण अभियान प्रभावीपणे राबवले जात आहे. या माध्यमातून जिल्हा शाश्वत कुपोषणमुक्त करण्याचा संकल्प करूया, असे लंघे यांनी सांगितले.
रूबल अग्रवाल म्हणाल्या, कुपोषणमुक्तीचा नगर पॅटर्न राज्यात प्रसिद्ध आहे. लोकसहभागातून अनेक चांगली कामे झाली आहेत. जिल्ह्यात कमी वजनाचे एकही मूल राहणार नाही, असा निर्धार प्रत्येकाने करावा.
उत्कृष्ट कार्य करणार्‍या 21 अंगणवाड्या पर्यवेक्षिका, 63 अंगणवाडी सेविका व 63 मदतनीस अशा 147 महिला कर्मचार्‍यांचा अध्यक्ष लंघे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.