आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Malpractice Increasing Cross Traffic In Ahmednagar

बायपास होऊनही अवजड वाहने शहरात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- अरुंद रस्ते, वाढती अतिक्रमणे बेशिस्त वाहतूक यामुळे आधीच शहराचा श्वास कोंडला आहे. चौकांमध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे अपघात होतात. त्यात भर पडते अवजड वाहनांची. या वाहनांच्या रहदारीमुळे शहरात आजवर अनेकांचे बळी गेले. त्यावर उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी परिपत्रक काढून सकाळी सायंकाळी ठरावीक वेळेत अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी केली. पण हा आदेश अजून कागदावरच आहे. प्रवेशबंदीचा आदेश झुगारुन अवजड वाहने सर्रास शहरात प्रवेश करत आहेत.

शहरात सकाळी, सायंकाळी शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी नोकरदारांची मोठी वर्दळ असते. त्यात इतर वाहनांचीही भर पडते. या कालावधीत अवजड वाहनांनी शहरात प्रवेश केल्यामुळे वाहतूक कोंडी होते. या कोंडीमुळे आतापर्यंत झालेल्या अपघातांत अनेक निष्पापांचे बळी गेले आहेत. अशा अपघातांना आळा बसावा, याकरिता तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांनी अधिसूचना काढून सकाळी ते 12 , तसेच सायंकाळी ते रात्री या वेळेत अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी केली. सर्व महामार्गांवर तसे फलकही लावण्यात आले.
शहरातील वाहतूक नियमनाची जबाबदारी शहर वाहतूक शाखेची आहे. पण या शाखेकडून अपुऱ्या मनुष्यबळाचे कारण पुढे केले जाते. त्याचा गैरफायदा घेत अवजड वाहने बेकायदेशीरपणे शहरात प्रवेश करतात. मध्यंतरी "टीम दिव्य मराठी'ने केलेल्या पाहणीत सोलापूर, पुणे, मनमाड, औरंगाबाद, तसेच कल्याण महामार्गावरून अवजड वाहने बिनदिक्कत शहरात प्रवेश करत असल्याचे आढळून आले. यात इतर राज्यांतून येणारे कंटेनर, ट्रेलर, तसेच वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकचाही समावेश होता. वाहतूक पोलिसांची अडचण दूर व्हावी, म्हणून काही महिन्यांपूर्वी या शाखेत पोलिसप्रमुखांनी १५ कर्मचारी वाढवले होते.
शहराबाहेरील बायपासची दुरवस्था झाली असल्यामुळे अवजड वाहने शहरात प्रवेश करतात, असा बचाव करण्यात येत होता. पण आता रस्त्यांची अवस्था चांगली आहे. तरीही अवजड वाहने शहरातूनच मार्गक्रमण करत आहेत. प्रवेशबंदीच्या फलकांकडे अवजड वाहनचालक सर्रासपणे दुर्लक्ष करतात. बायपासजवळ महामार्गांवर वाहतूक पोलिसांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. आता हे पोलिसही दिसत नाहीत. "टीम दिव्य मराठी'ने वाहतूक व्यवस्थेबाबत नागरिकांची मते विचारली असता प्रशासन, पोलिस मनपाच्या उदासीनतेमुळेच प्रवेशबंदीची अधिसूचना केराच्या टोपलीत गेली असल्याचे परखड मत त्यांनी व्यक्त केले.
बायपासचा प्रवास नकोच
पोलिसअधीक्षक लखमी गौतम यांनी पदभार स्वीकारला, तेव्हा वाहतूक नियमनाला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले होते. त्यांनी केडगाव ते निंबळक या बाह्यवळण रस्त्याची पाहणीही केली होती. शहरातील अवजड वाहूतक बाह्यवळण रस्त्याने वळवण्याच्या सूचना त्यांनी केल्या होत्या. या आदेशाची अंमलबजावणी काही दिवसच झाली. मनमाड महामार्गावर निंबळक बायपासजवळ, औरंगाबाद महामार्गावर शेंडी बायपासजवळ वाहतूक पोलिस नेमले गेले. बायपास रस्ते चांगले झाले, तरीही अवजड वाहने प्रवेशबंदी असलेल्या वेळेत शहरात घुसत आहेत.
पावती फाडून प्रवेश
प्रवेशबंदीअसलेल्या वेळेत शहरात अनधिकृतपणे प्रवेश करणाऱ्या अवजड वाहनचालकांकडून शहर वाहतूक शाखेने दंड वसूल करणे अपेक्षित आहे. वाहतूक शाखा अशा अवजड वाहन चालकांकडून दंडाची पावती फाडतेसुद्धा. पण ही पावती म्हणजे शहरात अधिकृत प्रवेश करण्याचा परवाना बनली आहे. पावती फाडल्यानंतर वाहनचालक अवजड वाहने तशीच पुढे दामटतात. त्यामुळे वाहतूक शाखेची तिजोरी दंडाच्या रकमेने भरत असली, तरी शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मात्र कायम आहे. काही पोलिस वाहनचालकांना विशिष्ट टोकन देतात. तो दाखवला की नंतर कोणी अडवत नाही.
पोलिसांची कमतरता
वाहतूकशाखेत पोलिस कर्मचाऱ्यांची कमतरता होती. वाहतूक शाखा स्थापन झाली त्यावेळी १०० कर्मचारी होते. चार महिन्यांपूर्वी ६५ पोलिस कर्मचारी होते. नव्याने सेवेत आलेल्यांपैकी १५ कर्मचारी वाहतूक शाखेत नेमण्यात आले. म्हणजे वाहतूक शाखेचे संख्याबळ आता ८० झाले आहे. दररोज उपलब्ध कर्मचाऱ्यांची संख्या ५० गृहित धरली जाते. अवजड वाहनांना शहरात प्रवेश बंदी असलेल्या वेळेत मनमाड रस्त्यावर दोन वाहतूक पोलिस बंदोबस्तासाठी नेमलेले आहेत. इतर चौकांमध्ये वाहतुकीचे नियमन करण्यासाठी पोलिस नेमले आहेत. परंतु बऱ्याचदा ते तेथे दिसत नाहीत.
आणखी किती बळी?
नियमतोडून अवजड वाहने शहरात प्रवेश करतात. पण पोलिस केवळ बघ्याची भूमिका घेते. वाहतुकीचे नियम फक्त कागद रंगवण्यासाठीच आहेत का? एकीकडे शहरात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी नाकाबंदीची कारवाई केली जात आहे. पण अवजड वाहनांना शिस्त कोण लावणार? अवजड वाहनांमुळे अनेकांचे बळी गेले आहेत बाह्यवळण रस्त्यांचे काम वर्षानुवर्षे पूर्ण होत नाही. आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार आहे? शहरातून होत असलेल्या अवजड वाहनांच्या अनधिकृत वाहतुकीला आळा बसायलाच हवा.'' अॅड.शिवाजी कराळे, अध्यक्ष,शिवशंभो प्रतिष्ठान.