आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Malshej Ghat Accident: Ajit Pawar Blaimed On Public Development Department

माळशेज घाट अपघात:अजित पवारांनी फोडले बांधकाम विभागावर खापर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - माळशेज घाटात झालेल्या अपघातात जखमींची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सकाळी आळेफाटा येथे जाऊन विचारपूस केली. नंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात समन्वय नसल्याचे सांगत या अपघाताचे खापर त्यांच्यावर फोडले.
पवार सकाळी आळेफाटा येथील सोनवणे हॉस्पिटलमध्ये आले. जखमींची विचारपूस केल्यानंतर त्यांनी सर्वाधिक मृत्यू झालेल्या अणे गावाला भेट दिली. तेथील सातजण ठार झालेल्या आहेर कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी पत्रकारांनी पवार यांना घाटरस्त्याचे चांगले काम का होत नाही, असा प्रश्न केला. त्यावर त्यांनी या प्रश्नावर बोलण्याची ही वेळ नाही. पण सार्वजनिक बांधकाम विभागात समन्वय नसल्याने असे घडत असल्याचे विधान केले. त्यांच्यासमवेत आमदार वल्लभ बेनकेही होते. त्यांनी सत्ता राष्ट्रवादीची, वित्त खातेही राष्ट्रवादीकडे, तरीही घाटरस्त्याचे काम का होत नाही, असा सवाल जुलै महिन्यात झालेल्या अपघाताच्या वेळी विचारला होता. त्याची पार्श्वभूमी असताना
पवार यांनी अपघाताचे खापर राष्ट्रवादीकडे असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागावर फोडून नवा वाद उभा केला. खासदार शिवाजी आढळराव यांनीही अणे येथे आहेर कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना तातडीची मदत 1 लाख 21 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.
मुलापाठोपाठ आईचाही मृत्यू
मुलाच्या मृत्यूची वार्ता ऐकून शुक्रवारी आईचाही मृत्यू झाला. अपघातातील जखमी संभाजी सदाशिव जाधव (वडगाव आनंद, जि. पुणे) हा आजारी आईला भेटण्यासाठी गावी येत होता, पण मध्येच त्याच्यावर काळाने घाला घातला.
संभाजीच्या मृत्यूची वार्ता आईपासून लपवण्यात आली होती. मात्र, शुक्रवारी अंत्यविधीसाठी
तिला मुलाच्या मृत्यूची माहिती देताच त्या धक्क्याने तिचीही प्राणज्योत मालवली.
चालक मद्यपी नव्हता; एस. टी. महामंडळाचा खुलासा
ठाणे जिल्ह्यातील माळशेज घाटात गुरुवारी (2 जानेवारी) सकाळी एस. टी. महामंडळाची बस कोसळून 27 प्रवासी ठार झाले. या बसचे चालक के. एन. चौधरी यांनी मद्यप्राशन केले असल्याचे मृतदेह बाहेर काढणा-या युवकांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले होते. तसे वृत्त शुक्रवारी प्रसिद्ध झाल्यानंतर महामंडळाने शुक्रवारी त्याबाबत खुलासा करत बस चालक चौधरी यांनी मद्यप्राशन केले नव्हते. आदर्श वाहतुकीसाठी त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले होते, असे स्पष्ट केले.