आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"माळढोक'चे श्रेय घेण्यावरून राजकारण, "माळढोक'चा प्रश्न मार्गी लावल्याचा शिंदे-पाचपुतेंचा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - माळढोक अभयारण्याचे श्रेय घेण्यावरून विद्यमान पालकमंत्री राम शिंदे माजी पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्यात चांगलीच जुंपली आहे. माळढोकचा प्रश्न आपल्यामुळेच मार्गी लावल्याचा दावा पाचपुते यांनी केला असतानाच शिंदे यांनीही आपणच माळढोक प्रश्नाबाबत महत्त्वाची भूमिका बजावल्याचा दावा केला आहे.

श्रीगोंदे-कर्जत तालुक्यांतील माळढोक क्षेत्र पक्षी अभयारण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. आरक्षणात या भागातील हजारो शेतक-यांच्या जमिनी गेल्या आहेत. आरक्षणामुळे जमिनी खरेदी विक्रीवर निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे शेतक-यांना या जमिनीची खरेदी विक्री करता येत नव्हती. या प्रश्नांसाठी गेल्या २२ वर्षांपासून माजी पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली या भागातील शेतकरी या जमिनीच्या खरेदी-विक्रीसाठी लढा देत होते. याबाबत पाचपुते यांनी सर्वोच्च न्यायालयात देखील लढा दिला होता. दोन दिवसांपूर्वी माळढोक पक्षी अभयारण्यातील खासगी क्षेत्रातील जमिनीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहाराला काही अटींवर परवानगी देण्याचा निर्णय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे. राज्य वन्यजीव मंडळाच्या २२ जून रोजी झालेल्या बैठकीत याबाबत सविस्तर चर्चा झाली. याबाबत महसूल वनविभागाने खासगी जमिनींच्या व्यवहाराबाबत सकारात्मक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार अभयारण्यातील अधिसूचित खासगी क्षेत्राच्या मूळ वापरात कोणताही बदल करता जमीनमालकास जमिनीवर कर्ज काढणे किंवा गहाण ठेवण्यास कुठलीही हरकत घेण्यात येणार नाही. अभयारण्याच्या ३६६.३७ चौरस किलोमीटर क्षेत्राला या निर्णयाचा लाभ होणार आहे. प्रस्तावित पुनर्गठण प्रस्तावात अभयारण्यासाठी ४८०.२ हेक्टर खासगी क्षेत्राव्यतिरिक्त अन्य कोणतेही क्षेत्र संपादित करण्यात येणार नसल्याचे या निर्णयातून पुढे आले आहे. पालकमंत्री शिंदे, कामगारमंत्री विजयकुमार देशमुख यांनी अभयारण्यातील खासगी क्षेत्राबाबत सकारात्मक तोडगा काढण्याची मागणी वनमंत्री मुनगंटीवार यांच्याकडे केली होती, अशी माहिती खुद्द शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकात दिली आहे.

माळढोकच्या प्रश्नावर आपणच तोडगा काढल्याचा दावा पाचपुते यांनी केला असतानाच शिंदे यांनी या प्रश्नावर आपणच पाठपुरावा केल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे माळढोकवरून पाचपुते शिंदे यांच्यातच जुंपण्याची चिन्हे आहेत.
जमिनी खरेदी-विक्रीबाबत सकारात्मक तोडगा
आपणकामगार राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांनी माळढोक पक्षी अभयारण्यातील खासगी क्षेत्रातील जमिनी व्यवहाराबाबत येणा-या अडचणींसंदर्भात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदन देऊन यावर तोडगा काढण्याची मागणी केली होती. वनमंत्री मुनगंटीवार यांनी २२ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वन्यजीव मंडळाच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर माळढोक अभयारण्य क्षेत्रातील जमिनी खरेदी विक्रीच्या व्यवहाराबाबत सकारात्मक तोडगा काढण्यात आला, असे पालकमंत्री शिंदे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

प्रश्न सुटणे महत्त्वाचा
माळढोक अभयारण्यासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनींची खरेदी विक्री करताना शेतक-यांना अडचणी येत होत्या. शेतक-यांना न्याय मिळावा, यासाठी गेल्या २२ वर्षांपासून लढा देत आहे. वनमंत्री मुनगुंटीवार यांच्याबरोबर चार दिवसांपूर्वी याबाबत चर्चा देखील झाली. ज्याला माळढोक माहिती नाही, ते लोक माळढोकबाबत माझ्याकडून सल्ले घेत. आता तेच लोक माळढोकचे श्रेय घेत आहेत. लोकांना माहीत आहे हे कोणाचे श्रेय आहे ते माळढोकचे श्रेय हे आपलेच आहे. श्रेयापेक्षा प्रश्न सुटणे महत्त्वाचा आहे. बबनरावपाचपुते, माजीपालकमंत्री.
बातम्या आणखी आहेत...