आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौंडिण्य यांच्या निधनाने स्नेहालयाचा आधारस्तंभ हरपला..

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - ज्येष्ठ विचारवंत व शिक्षणतज्ज्ञ मामासाहेब कौंडिण्य यांच्या निधनाने स्नेहालयाचा आधारस्तंभ हरपला आहे, अशा शब्दांत संस्थेच्या वतीने त्यांना र्शद्धांजली अर्पण करण्यात आली.

स्नेहालयाचे पायाचे दगड आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून मामांचे मोठे योगदान राहिले. आम्हा कार्यकर्त्यांचे ते प्रेरणास्थान होते, असे स्नेहालयाचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी म्हणाले. अखेरच्या काळात मामांनी स्नेहालयात राहून राज्यभर फिरून व्याख्याने देत वेश्या व त्यांच्या संततीकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलला. संगमनेर येथील आपले घर व जागा विकून आलेले सर्व पैसे मामांनी स्नेहालय, लोकपंचायत आदी 11 संस्थांना दिले. मध्यंतरी आजारी असताना मामांनी डॉक्टरांना सांगितले, ‘‘खर्चिक उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यापेक्षा हे जग मला सोडून जाऊ द्या. माझे जीवित कार्य संपले आहे. माझ्या उपचारांच्या पैशांतून 10 गरीब मुलांचे शिक्षण होईल’, असे डॉ. कुलकर्णी म्हणाले.

मामासाहेब हे स्नेहालयाचे मार्गदर्शक आणि आधारस्तंभ होते. त्यांनी ठेवलेल्या कायम निधीतून संस्था तृणमूल कार्य करणार्‍यांना पुरस्कार देते. विधायक कामे करणार्‍या 318 संस्था व कार्यकर्त्यांना आतापर्यंत गौरवण्यात आले आहे, असे स्नेहालयचे अध्यक्ष सुवालाल शिंगवी यांनी सांगितले.

महात्मा गांधी यांच्या विश्वस्त भावनेशी तादात्म्य पावलेले महान व्यक्तिमत्त्व आज गमावले, असे दीपक पापडेजा म्हणाले.

म. वि. कौंडिण्य यांचे अल्पचरित्र

जन्म - 17 मार्च 1933, अंमळनेर (खानदेश), 1958-61 - अहमदनगर महाविद्यालयात अर्थशास्त्राचे व्याख्याते., 1961-93 - संगमनेर महाविद्यालयात प्राचार्य., 1968-72 - पुणे विद्यापीठाच्या एक्झिक्युटिव्ह कौन्सिलचे सदस्य., 1972-75 - पुणे विद्यापीठाच्या समाजशास्त्र कौन्सिलचे डीन., 1963-72 - शालांत परीक्षा मंडळाचे सदस्य., सदस्य - नियोजन मंडळ उच्च शिक्षण अभ्यास गट,, विश्वस्त - कुसुमाग्रज प्रतिष्ठान (10 वर्षे), भास्करराव दुर्वे प्रतिष्ठान (5 वर्षे), प्रवर्तक - मुक्तांगण स्वायत्त विद्यापीठ, धनंजयराव गाडगीळ प्रतिष्ठान, अथर्शी ग्रामीण विकास केंद्र., आदिवासी, विडी कामगार, लहान शेतकरी, रामोशी, पारधी आदींसाठी विविध 15 ग्रामीण विकास प्रकल्प., पुरस्कार - जी. डी. पारिख अवॉर्ड (1991), एस. व्ही. कोगेकर अँवॉर्ड (1992), चतुरंग प्रतिष्ठानचा जीवन गौरव पुरस्कार (1993), इंडियन र्मचंट चेंबर्स अवॉर्ड (1994), अहमदनगर ऐतिहासिक संग्रहालय पुरस्कार (1995), ज्ञान-विज्ञान पुरस्कार (2006)., पुस्तके - लिंकेज, शोधपर्व, मुक्तांगण, संघर्षाकडून सामंजस्याकडे, ते हरतील; आपण चालत राहू...

(छायाचित्र : 15 जून 2012 रोजी मामासाहेब कौंडिण्य त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी स्नेहालयात आले होते. त्यांच्यासमवेत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व मेजर दिनुभाऊ कुलकर्णी.)