आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीगोंदे येथील पुरात एक जण वाहून गेला

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोंदे - शहरासह तालुक्यात गुरुवारी दुपारी मुसळधार पावसाने झोडपून काढले. वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाने नद्या व नाल्यांना पूर आला. लेंडी नाल्याला आलेल्या पुरात शाबू साहू घोडके हा वाहून गेला. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नाही. गुरुवारी दुपारी सुरू झालेला पाऊस सुमारे पाच तास सुरू झाला. या पावसाने सरस्वती नदीला पूर आला. श्रीगोंदेतील शारदा विद्या संकुलाकडे जाणारा पूल दुसर्‍यांदा या पुरात वाहून गेला. सिद्धेश्वर मंदिराच्या पायर्‍यांना पुराचे पाणी टेकले होते. श्रीगोंदे-कर्जत मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. शहरातील अनेक घरांची यामध्ये पडझड झाली. श्रीगोंदे, बेलवंडी, मढेवडगाव, पारगाव, आढळगाव येथेही पावसाचा जोर होता. देवदैठणे, मांडवगण व कोळगाव परिसरात मात्र पावसाने विर्शांती घेतली होती.

लेंडी नाल्याला आलेल्या पुरात रस्ता ओलांडत असताना शाबू घोडके हा वाहून गेला. तो वाहून जात असताना मदतीसाठी नदीपात्रात कोणीही उतरले नाही. गुरुवारी रात्रीपर्यंत त्याचा शोध लागला नव्हता. लेंडी नाल्याला पूर आल्याने बाजार तळात सर्वदूर पाणी दिसत होते. या पावसाने अनेक ठिकाणी झाडे पडली.