आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाण्याच्या शाश्वतीसाठी व्यवस्थापन महत्त्वाचे; शास्रज्ञ डाॅ. इयान स्माॅट यांचे प्रतिपादन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुरी शहर- जगाच्या तुलनेत आशिया खंडात सर्वांत कमी पाणीसाठे आहेत. भूगर्भातील पाण्याचा सर्वात जास्त वापर होत असल्याने दिवसेंदिवस पाण्याचे दुर्भीक्ष्य वाढत चालले आहे. त्यासाठी सांडपाण्याचा पुर्नवापर, शेतीला सूक्ष्म सिंचनाची जोड, पाणी वाटपाच्या पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण, तसेच पाणी गळतीचे प्रमाण थांबवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन युनायटेड किंडम येथील लाॅगबोराॅग विद्यापीठाचे शास्रज्ञ डाॅ. इयान स्माॅट यांनी केले. 


राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी तंत्रज्ञान महाविद्यालयात सुवर्ण जयंती वर्षानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानात डॉ. स्मॉट बोलत होते. ते पुढे म्हणाले, पाण्याचा अपवय टाळायचा असेल, तर पाणी व्यवस्थापन आणि वाटप व्यवस्था अधिक सक्षम असणे गरजेचे आहे. 


कुलगुरु डॉ. के. पी. विश्वनाथा म्हणाले, पाण्याच्या दुर्भिक्षानंतरच पाण्याचे महत्त्व आपल्याला कळते. जगातील एकूण पाणीसाठ्यांपैकी फक्त तीन टक्के पाणी वापरायोग्य राहिल्याने पाण्याचा काटकसरीने वापर होणे आवश्यक आहे. अन्नसुरक्षेनंतर पाणी सुरक्षा अतिशय महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमास वानेसा स्मॉट, सहयोगी अधिष्ठाता डॉ. जगन्नाथ पाटील, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डी. डी. पवार, डॉ. राजेंद्र पाटील, नियंत्रक विजय कोते, सोनई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरी मोरे, विभागप्रमुख डॉ. सुनील गोरंटीवार उपस्थित होते. 

बातम्या आणखी आहेत...