आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरच्या आंबा उत्पादकांना प्रतीक्षा शासनाच्या मदतीची

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- गारपीट व अवकाळी पावसामुळे उत्तर व पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यातील फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना राज्य सरकारने केवळ कोकणातील आंबा उत्पादकांना मदत देण्याची घोषणा केल्याने नगरसह अन्य जिल्ह्यांतील शेतकरी नाराज झाले आहेत.
कमी पावसामुळे नगर जिल्ह्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती िनर्माण झाली आहे. दुष्काळाचे संकट उभे असतानाच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे केले. अकोले, संगमनेर, पाथर्डी, कोपरगाव, नेवासे, राहुरी, राहाता, नगर, पारनेर, श्रीगोंदे व श्रीरामपूर या तालुक्यांत ९ ते १४ मार्चदरम्यान अवकाळी पाऊस व गारपीट झाली. त्यामुळे ४६ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे सुमारे दीडशे कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सर्वाधिक नुकसान संत्रा, आंबा, मोसंबी, डाळिंब या फळबागांचे झाले. गारपिटीमुळे फळबागांमधील फळे गळून पडल्याने त्यांची नासाडी झाली. नगर िजल्ह्यातून मोठ्या प्रमाणात फळांची िनर्यात मुंबई, पुणे, नाशिकसह राज्याच्या अन्य भागात होते. यंदा मात्र अवकाळीने या फळबागांवर अवकळा आणली आहे. त्यामुळे िनर्यात पन्नास टक्क्यांहून कमी होणार आहे. काही िठकाणी, तर संपूर्ण फळबागांच उद््ध्वस्त झाल्या आहेत.
फळबागायतदार शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा असताना शासनाने केवळ कोकणातील आंबा उत्पादकांना भरीव मदत जाहीर केली. कोकणाबरोबर उत्तर महाराष्ट्रातील नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे व िवदर्भातील नागपूर, अमरावती, यवतमाळ, अकोला, मराठवाड्यातील बीड, आैरंगाबाद, परभणी, लातूर, उस्मानाबादसह अन्य िजल्ह्यांत आंबा पिकासह अन्य फळबागांचे नुकसान झाले अाहे. या शेतकऱ्यांना मात्र सरकारने मदतीपासून वंचित ठेवले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया आहेत.
मंत्र्यांना फिरू देणार नाही...
नगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे रब्बी हंगामाचे नुकसान झाले असताना केंद्र व राज्यातील भाजपचे सरकार त्याबाबत गंभीर नाही. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय सरकारने त्वरित घ्यावा; अन्यथा मार्क्सवादी किसान सभा रस्त्यावर उतरून भाजपचे मंत्री व पदाधिकाऱ्यांना रस्त्याने फिरण्यास मज्जाव करील.''- डॉ. अजित नवले