आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंब्यांचे दिवस: फळांचा राजा आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- फळांचा राजा असलेला हापूस आंब्याचा दर सध्या सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी हापूसचा दर निम्याने कमी झाला आहे. दोन डझन रत्नागिरी देवगडचा हापूस आंब्याचा दर 400 ते 800 व 4 डझनांचा दर 1000 ते 2000 आहे. लालबाग, म्हैसूर व मद्रासकडील आंबाही बाजारात दाखल झाला आहे. दोन डझन लालबाग 100 ते 150, म्हैसूर 150 ते 200, मद्रास 300 ते 500 असा सध्या भाव आहे.

कोकण, केरळ व कर्नाटकातून आंब्याची आवक वाढली आहे. रोज सुमारे 25 टन आवक होत आहे. त्यात आठ टन हापूस असतो. गावरान आंबा अजून बाजारात आलेला नाही. नवीपेठेतील रस्त्यांच्या दुतर्फा आंब्यांची दुकाने लागली आहेत. ग्राहकांची गर्दी वाढते आहे. गुढीपाडव्यानंतर मागणी आणखी वाढेल.


दर घसरण्याची शक्यता
पुढील महिन्यात गुजराथचा आंबा बाजारात येईल. त्यामुळे हापूसचे दर घसरण्याची शक्यता आहे. गुजराथचा हापूस, डाळिंबी, केशर आंब्याला चांगली मागणी असते. या महिन्यात कोणतीही लग्नतीथ नसल्याने व विविध ठिकाणांहून आंब्याची आवक वाढल्याने दर पन्नास टक्क्यांनी घसरले आहेत.’’ पप्पू आहुजा, आंबा विक्रेता

हापूसची चव घेणे यंदा शक्य
"मागील वर्षी दर दोन डझनाला 2500 ते 3000 असल्याने हापूस विकत घेणे शक्य झाले नाही. यंदा एप्रिलमध्येच हापूसचा दर 1000 पर्यंत खाली आल्याने हापूस खरेदी करता आला. सर्वसामान्यांना हापूसची चव चाखायला मिळाली. ’’ -सचिन धाडगे, ग्राहक