आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संघाचे माजी क्षेत्र संघचालक माणिकराव पाटील कालवश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम क्षेत्राचे माजी संघचालक माणिकराव पाटील यांचे शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता आगरकर मळ्यातील राहत्या घरी निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्यावर शनिवारी दुपारी अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे तीन मुले, दोन मुली, जावई, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
माणिकराव पाटील यांनी संघात अनेक महत्त्वाची पदे भूषवली. २८ ‌वर्षे ते नगर जिल्हा कार्यवाह होते. त्यांनी संघाचे महाराष्ट्र प्रांत संघचालक म्हणूनही काम पाहिले. नंतर ते पश्चिम क्षेत्र संघचालक झाले. महाराष्ट्र, गुजरात व गोवा या तीन राज्यांची जबाबदारी त्यांच्याकडे होती. आणीबाणीत ते १९ महिने कारावासात होते. पुणे विद्यापीठाच्या वतीने त्यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले होते. पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाचे ते काही काळ सदस्य होते. केंद्रीय मूल्यमापन कार्यक्रमाचे जनक म्हणून ते ओळखले जात. पेमराज सारडा महाविद्यालय सुरु करण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले. पाटील यांनी आणीबाणीतील अनुभवांवर "दु:शासन पर्व' हे पुस्तक लिहिले.
त्यांच्या पार्थिवावर अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी खासदार दिलीप गांधी, आमदार अनिल राठोड, राम शिंदे, अरुण जगताप, डॉ. सुधीर तांबे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, स्नेहालयाचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकणी, संघाचे पश्चिम क्षेत्राचे संघचालक नानासाहेब जाधव, प्रांत संपर्क प्रमुख राजाभाऊ मुळे, पुणे प्रांत प्रचारक अतुल लिमये, अशोक झरकर आदी उपस्थित होते.