आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manmad, Aurangabad, Pune Way Of White Stripes Disappear

मनमाड, औरंगाबाद पुणे रस्त्यांवरील पांढरे पट्टे गायब

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - मनमाड,औरंगाबाद पुणे महामार्गावरील दुभाजकाच्या दोन्ही बाजूने रस्त्याच्या कडेला मारलेले पांढरे पट्टे गायब झाले आहेत. या पांढऱ्या पट्ट्याचा अंदाज घेऊन रात्रीच्या वेळी चालक वाहन चालवतात. मात्र, मनमाड महामार्गावर लोणीपासून कोल्हार, तर राहुरीपासून नगरपर्यंत, तसेच औरंगाबाद महामार्गावर नेवासे फाट्यापर्यंत हे पांढरे पट्टेच नाहीत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. महामार्गावर पांढरे पट्टे दुभाजकांवर प्रकाश परावर्तक बसवण्यात यावे, अशी मागणी प्रवासी चालकांकडून होत आहे.
पांढरे पट्टे नसल्याने रात्रीच्या वेळी समोरून येणाऱ्या वाहनांच्या प्रखर प्रकाशामुळे दुभाजक दिसत नाहीत. पट्टे नसल्याने रस्त्याचा अंदाजही चालकांना येत नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढते. औरंगाबाद मार्गावरील दुभाजकावर असलेले बरेचसे प्रकाश परावर्तक चोरीस गेले आहेत, तर मनमाड मार्गावरील दुभाजकांवर प्रकाश परावर्तकच बसवलेले नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी दुभाजक दिसत नाहीत. त्यामुळे बरेच चालक दुभाजकावर धडकतात.

गतिरोधकाच्या पूर्वसूचना देणारे पांढरे पट्टे काढणे किंवा ते पुसून गेल्यावरही त्याकडे दुर्लक्ष करणे नित्याचे झाले आहे. वाहनचालकाला पूर्वसूचना देण्याच्या उद्देशाने प्रत्येक गतिरोधकावर पांढरे पट्टे काढावे असा नियम आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. दुभाजकांचे काळेपिवळे पट्टे गायब झाले आहेत. दोन लेनमधीन पांढऱ्या पट्या, चौफुलींवरचे झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे गायब झाल्याने वाहतूक सुरक्षेचा बोजवारा उडाला आहे.

मनमाड पुणे मार्गावर काही ठिकाणी दुभाजक पांढरे पट्टे नाहीत. त्यामुळे चालकांना अंदाज घेऊनच वाहन चालवावे लागते. महामार्गावरील कामाच्या अनेक त्रुटींमुळे निष्पाप नागरिकांचे बळी गेले आहेत. काहींना अपंगत्व आले आहे. अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. हा कामे करण्यासाठी आणखी किती बळी प्रशासनाला अपेक्षित आहेत, असा संतप्त प्रश्न प्रवासी चालकांकडून विचारला जात आहे.
मनमाड पुणे मार्गावर काही ठिकाणी दुभाजक पांढरे पट्टे नाहीत. त्यामुळे चालकांना अंदाज घेऊनच वाहन चालवावे लागते. महामार्गावरील कामाच्या अनेक त्रुटींमुळे निष्पाप नागरिकांचे बळी गेले आहेत. काहींना अपंगत्व आले आहे. अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. हा कामे करण्यासाठी आणखी किती बळी प्रशासनाला अपेक्षित आहेत, असा संतप्त प्रश्न प्रवासी चालकांकडून विचारला जात आहे.

पांढरे पट्टे आवश्यकच
मीदररोज औरंगाबाद महामार्गाने प्रवास करतो. कधी रात्रीही प्रवास करावा लागतो. दिवसा या पांढऱ्या पट्ट्यांचे महत्त्व कळत नाही. रात्री पांढऱ्या पट्ट्यांचा आधार घेऊनच चालक वाहन चालवतो. पट्टे नसल्याने अपघाताची शक्यता बळावते. रात्रीच्या वेळी अपघात घडू नये, यासाठी तातडीने रस्त्यावर पांढरे पट्टे, तसेच दुभाजकांवर रेडियम लावण्यात यावे. झेब्रा क्रॉसिंगही गरजेचे आहे.'' विष्णूगायकवाड, न्यायाधीश, जिल्हा ग्राहक न्यायालय.

जबाबदारी ठेकेदारांची
औरंगाबाद,मनमाड पुणे रस्त्याचे बीओटीतून चौपदरीकरण करण्यात आले आहे. या रस्त्यांवर ठेकेदारांकडून टोलवसुली सुरू आहे. सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या सुधारणा करण्याची जबाबदारी ठेकेदाराची असून ठेकेदारांकडून काम करवून घेण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागावर आहे. यासंदर्भात बांधकाम विभागाकडे विचारणा केली असता ठेकेदाराला सूचना दिल्याची मोघम प्रतिक्रिया देण्यात आली.