आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘कोपर्डी’च्या तपासात त्रुटी नकोत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्जत - कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार खून प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे. हा खटला लवकरच सुरू होणार आहे. दरम्यान, तपासातील त्रुटींमुळे कोणत्याही आरोपींची सुटका होऊ नये, याची दक्षता घेण्याची मागणी कोपर्डी येथील ग्रामस्थांनी पत्रकाद्वारे केली आहे.
सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणात एकच आरोपी असल्याचे सांगितले होते. ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी इतर दोन आरोपींना अटक केली. त्यानंतर चौथ्या आरोपीची चौकशी करण्यात आली, तथापि त्यास सोडून देण्यात आले. या प्रकरणातील वस्तुस्थिती जेव्हा समोर आली, तेव्हा राज्यात देशात प्रतिक्रिया उमटली. मराठा समाज आक्रमक झाला. राज्यात लाखोंच्या संख्येने मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत.
कोपर्डीतील ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्ते तपासाबाबत पोलिस यंत्रणेकडे पाठपुरावा करत आहेत. घटनेला दोन महिने झाले, तरी आरोपींविरोधात चार्जशीट दाखल करण्यात आलेले नाही. पोलिस जाणीवपूर्वक ढिलाई करत आहेत. सत्ताधारी पोलिस अधिकारी या प्रकरणाला वेगळी कलाटणी देण्याचा प्रयत्न करत आहेत, असा संशय ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. कोपर्डीतील प्रकार सामूहिक जातीय सलोख्यातून झाला नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी जर अशा पद्धतीने तपासात तडजोड करून वस्तुस्थिती दडपण्याचा पोलिस सरकारची गरज म्हणून या प्रकरणाला हवे तसे वळण देण्याचा प्रयत्न करत आरोपींना सुटण्यास वाव दिला, तर मोठा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा ग्रामस्थ सामाजिक संघटनांकडून पत्रकाद्वारे देण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...