आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: मराठ्यांनी \'अहमद\'नगर केले काबिज, डौलात फडकले भगवे, पीडितेचे वडील सहभागी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदनगर- कोपर्डी अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी अहमदनगरमध्ये आज (शुक्रवार) मराठा क्रांंती महामोर्चा काढण्यात आला. आतापर्यंत वेगवेगळ्या शहरांमध्ये निघालेल्या मोर्च्यांच्या तुलनेत नगरमधील मोर्चाला तुफान प्रतिसाद लाभला. लाखो मराठा बांधव आणि इतर समाजाचे नागरिकही यात सहभागी झाले. मोर्चामुळे शहरातील व्यवहार पूर्णपणे ठप्प पडले आहेत. प्रत्येक रस्त्यावर सुमारे पाच-सहा किलोमीटर दूरपर्यंत रांगा लागल्या आहेत. कोपर्डी प्रकरणातील पीडितेचे वडीलही या मोर्चात सहभागी झाले आहेत. जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना पाच तरुणींने निवेदन देऊन मोर्चाचा समारोप करण्यात आला.
हेही वाचाः CM चे डोके फुटेल की पवारांची लॉटरी लागेल, वाचा मराठा मोर्चाचे संभाव्य राजकीय परिणाम

मोर्चात कोपर्डीतील पीडितेच्या वडिलांचा सहभाग...
संंपूर्ण जिल्ह्या, पुणे जिल्ह्यातील काही भाग आणि औरंगाबाद जिल्ह्यातील काही गावांमधूनही नागरिक मोर्चात सहभागी झाले होते. यात महिला आणि मुलींंची संंख्या लक्षणिय होती. महत्त्वाचे म्हणजे, कोपर्डीतील पीडित मुलीच्या वडिलांनीही सहभाग नोंदवला. कोपर्डीकरांनी या मोर्चातच एक छोटा वेगळा मोर्चा काढला होता. विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे- पाटील मोर्चात सहभागी झाले होते. नगर शहरातून सकाळी 5 ते रात्री 8 पर्यंत वाहनांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. बायपासमार्गे वाहतूक वळविली आहे. सर्व शाळांंना सुट्टी जाहीर करण्‍यात आल‍ी आहे.
25 हजार स्वयंसेवकांची फौज
मोर्चासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ठिकठिकाणी पोलिस चौक्या उभारण्यात आल्या होत्या. पण मराठा समाजाच्या 25 हजार स्वयंसेवकांची मोठी फौजच या मोर्चात काम करताना दिसून आली. त्यामुळे पोलिसांवर तसा फारसा कामाचा ताण पडला नाही. तसेच मोर्चाच शिस्त अखेरपर्यंंत टिकवून ठेवता आली. या दरम्यान पाच ते सात अॅम्ब्युलंसना जाण्यासाठी जागाही देण्यात आली. त्यासाठी मोर्चेकर नागरिक स्वतःहून बाजूला सरकले.
हेही वाचाः अकोला, लातूर, जालन्‍यात एकवटले 46 लाख मराठा बांधव

वाडिया पार्कवरुन निघााला मोर्चा...
मराठा क्रांती मोर्चासाठी नगरमध्ये समाजबांधव येण्यास पहाटेपासुन सुरुवात झाली होती. जिल्हयातील माजी मंत्री, आजी- माजी आमदार, विविध पक्षाचे पदाधिकारी तसेच स्वयंसेवकांचा ताफा वाडिया पार्कवर दाखल झाला होता. मुख्य मार्गावरील वाहतूक बंंद ठेवण्यात आली होती.
मोर्चासाठी कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील मोर्चेकरी बुधवारी (21 सप्टेंबर) नगरच्या दिशेने पायी निघाले होते. गुरुवारी रात्री ते नगरमध्ये दाखल झाले. त्यांचा मुक्काम ओम गार्डन येथे आहे. बलात्कार्‍यांना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी करतेे कोपर्डीकर मोर्चात सहभागी झाले आहेत.

पुढील स्लाइडवर वाचा, असा पार पडेल मोर्चा....महिनाअखेर मांडणार हिशेब... आणखी कुठे मोर्चे निघणार? नवव्या आणि दहाव्या स्लाईडवर बघा या मोर्चाचे लक्षवेधी व्हिडिओ.....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...