आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामोर्चाचे नियोजन; पारनेर येथे १० ला बैठक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हाधिकारी कार्यालयावर २३ सप्टेंबरला नेण्यात येणाऱ्या मराठा क्रांती महामोर्चाचे नियोजन करण्यासाठी पारनेर तालुक्यातील समाजबांधवांचा मेळावा १० सप्टेंबरला सकाळी अकरा वाजता आनंद लॉन येथे होणार आहे. मेळाव्यात समाजाच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा होऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल, असे संजीव भोर यांनी सांगितले.
कोपर्डी येथे घडलेल्या घटनेतील आरोपींना कठोर शासन व्हावे, अ‍ॅट्रॅासिटीचा गैरवापर थांबवण्यासाठी या कायद्यात सुधारणा करावी, मराठा समाजासाठी योग्य आरक्षण देण्यात यावे आदी मागण्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. आजवर झालेल्या मोर्चांना सर्वच जिल्ह्यांमध्ये मोठा पाठिंबा मिळाला असून नगरचा मोर्चाही यशस्वी करण्यासाठी तालुकानिहाय मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यास सर्व पक्ष, संघटनांचे विविध संघटनांचे आजी-माजी पदाधिकारी, सर्व स्तरातील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. नगर येथील महामोर्चामध्ये किमान ११ ते १२ लाख मराठा बांधवांना सहभागी करण्याचे नियोजन केले असून मोर्चात ते लाख महिलांचाही सहभाग असावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या महामोर्चामध्ये पारनेर तालुका मागे राहणार नाही, यासाठी या मेळाव्यात गावनिहाय नियोजन करण्यात येणार आहे.

२३ सप्टेंबरला नगर येथे जाण्यासाठी लागणारी वाहने, त्यासाठीचे मार्ग यावरही या बैठकीत विचारमंथन करण्यात येईल. या मेळाव्यासाठी तालुक्यातील जास्तीत जास्त समाजबांधवांना उपस्थित राहण्याचे अवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे, असे भोर यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...