आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरमध्ये उसळला लक्ष लक्ष मराठ्यांचा जनसागर, युवतींनी महिलांनी केले मोर्चाचे नेतृत्व

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - कोपर्डी प्रकरणाचा निकाल सहा महिन्यांत लावावा, अॅट्रॉसिटीच्या जाचक अटी शिथिल कराव्यात,● मराठा समाजास आरक्षण द्यावे,● आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्येकी सहा लाखांची मदत द्यावी, छत्रपती शिवाजी महाराजांचे जागतिक दर्जाचे स्मारक उभारावे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी मान्य कराव्यात आदी मागण्यांसाठी मराठा समाजाच्या वतीने शुक्रवारी नगरमध्ये काढण्यात आलेल्या मराठा क्रांती मूकमोर्चाला विराट जनसागर उसळला. गर्दीचे आतापर्यंतचे सर्व उच्चांक या मोर्चाने मोडले. ‘न भुतो भविष्यती’ अशी गर्दी या ऐतिहासिक शहराच्या सर्व रस्त्यांनी अनुभवली. शिस्तीचे माणुसकीचे अनोखे उदाहरणही या मोर्चाने सर्वांसमोर ठेवले.
सकाळी नऊ वाजता वाडिया पार्क परिसरात मराठा बांधव जमण्यास सुरुवात झाली. पाहता पाहता दोन तासांत तेथे लाखोंची गर्दी झाली. अन्य जिल्ह्यांतील गर्दीचा उच्चांक तोडण्याच्या जिद्दीने जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चासाठी गेल्या १५ दिवसांपासून मराठा समाज संघटनांकडून जय्यत तयारी सुरू होती. जिल्ह्यातील गावागावांत मोर्चाच्या नियोजनाच्या बैठका घेण्यात आल्या. सोशल साईटचा प्रभावी वापर करून प्रभावी वातावरण निर्मिती करण्यात आली. त्याची प्रचिती मोर्चासाठी उसळलेल्या जनसागरातून दिसून आली. गर्दी इतकी की, नगरमध्ये येणारे सर्व महामार्ग रस्त्यांवर मराठा बांंधव उभे होते.
िजल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या चांदणी चौकात मोर्चाचा समारोप झाला. कोपर्डी प्रकरणातील पीडिता निर्भया आणि उरी येथील दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या जवानांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी आठ युवतींनी मनोगत व्यक्त केले.

युवतींनी केले नेतृत्व
एकाही मोर्चेकऱ्याने काेणतीही घोषणा दिली नाही. आपल्या मागण्या आणि कोपर्डी प्रकरणातील निषेधाचे फलक त्यांनी हाती घेतले होते. त्याशिवाय हाती काळे झेंडे घेऊन काळ्या फिती लावून निषेध नोंदवण्यात आला. महिला आणि युवती मोर्चाचे नेतृत्व करत होत्या. मोर्चा समारोपस्थळी आल्यानंतर आठ युवतींनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना निवेदन दिले. या युवतींना कवडे यांनी ‘ग्लिम्पसेस ऑफ नगर’ हे पुस्तक भेट दिले.
शुक्रवारी नगर शहरात येणारा प्रत्येक रस्ता मोर्चासाठी येणाऱ्या वाहनांनी व्यापून गेला होता. प्रत्येक वाहनावर छत्रपती शिवरायांचे छायाचित्र असलेला भगवा ध्वज होता. कोणतीही घोषणा देता, गडबड करता समाजबांधव शहरात येत होते. नगरबाहेरून येणाऱ्या मोर्चेकऱ्यांंसाठी वाहनतळांच्या जागा अगोदरच निश्चित करण्यात आल्या होत्या. मोर्चाकरिता शहरात येणाऱ्या प्रमुख रस्त्यांवरच वाहनतळांचे नियोजन संयोजकांच्या वतीने करण्यात आले होतेे. मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी येणाऱ्या गर्दीमुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी पोलिसांनी शहरात येणाऱ्या सर्व महामार्ग प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक वळवण्याचे चोख नियोजन केले होते. त्यानंतर त्यांना कोणतेही काम करावे लागले नाही. वाडिया पार्क ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर २५ हजार स्वयंसेवकांनी सुरक्षा कडे तयार केले होते. यात युवतींचाही मोठा सहभाग होता. महापालिकेने जागोजागी पिण्याच्या पाण्याची, तसेच मोर्चादरम्यान महिलांसाठी फिरत्या स्वच्छतागृहाची व्यवस्था केली होती. शिवाय रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या होत्या. मोर्चादरम्यान बाजारपेठ शहरातील सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू होते. त्यामुळे या मोर्चाचे व्यापारी वर्गाने स्वागत केले.

भगवे अन् काळे झेंडे
मोर्चादरम्यान एकही घोषणा दिली गेली नाही. फक्त कोपर्डी प्रकरणाचा निषेध आणि मागण्यांचे फलक मोर्चेकऱ्यांच्या हाती होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र असलेले भगवे झेंडे आणि सोबतच कोपर्डी प्रकरणाचा निषेध करणारे काळे झेंडेही मोर्चेकऱ्यांच्या हाती होते. काळ्या फिती लावून निषेध नोंदवण्यात आला. झेंड्यांच्या संख्येचाही उच्चांक नोंदवण्यात आला. या मोर्चात पाच लाख लोकांच्या हाती भगवे झेेंडे होते.

मुस्लिम समाजातर्फे मोर्चात पाणीवाटप
मोर्चासाठी शहरात लाखो लोक जमा झाले होते. या लोकांच्या व्यवस्थेसाठी शहरातील इतर समाजांनी आपापल्या परीने मदत केली. मुस्लिम समाजासह पंजाबी, जैन, माळी इतर समाजांनी मोर्चेकऱ्यांना पाणी, चहा, नाश्ता केळीचे वाटप केले. सामाजिक सौहार्दाचे हे अनोखे उदाहरण नगरकरांनी या मोर्चाच्या निमित्ताने समोर ठेवले. शहराची धार्मिक एकात्मतेची परंपरा यानिमित्ताने जपली गेली.

गर्दीचे वेगवेगळे दावे; उच्चांक कायम
मोर्चातील गर्दीबाबत अनेक दावे करण्यात आले. संयोजकांनी ३३ लाख लोक आल्याचा दावा केला, तर पोलिसांच्या मते ही गर्दी १६ लाखांची होती. काही जाणकारांनी हा अंदाज २० लाखांपर्यंत व्यक्त केला. कारण शहरातील बाहेरील सर्व रस्त्यांवर १२ किलोमीटरपर्यंत लोकांचा जमाव होता. त्यांना शहरात येणे शक्यच झाले नाही. नगर ते शिर्डी दरम्यान ८० किलोमीटर रस्त्यावर वाहतूक खोळंबली होती.

मोर्चानंतर स्वच्छता
मोर्चातसहभागी समाजबांधवांनी अावाहन केल्यानुसार स्वच्छता पाळली, तरी या मार्गावर काही ठिकाणी पाण्याचे पाऊच, पाण्याच्या बाटल्या आणि अन्य कचरा पडलेला होता. मोर्चेकरी स्वयंसेवकांनी संपूर्ण मार्ग झाडून कचरा गोळा करून स्वच्छ केला. त्यात राजकीय नेते कार्यकर्त्यांनीही भाग घेतला. त्यामुळे मोर्चाचे मार्ग तातडीने स्वच्छ झाले. त्यानंतर मनपाच्या यंत्रणेद्वारेे हा कचरा उचलण्यात आला. मनपानेही स्वतंत्ररित्या स्वच्छता मोहीम राबवली.
बातम्या आणखी आहेत...