आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठा आरक्षणासाठी चार एप्रिलला मोर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोले - मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी 4 एप्रिल रोजी मंत्रालयावर मराठा समाजाचा धडक मोर्चा छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणार आहे. या मोर्चात राज्यातील सर्व मराठा संघटना, संस्थांनी व विविध राजकीय पक्षांतील मराठा समाजाचे पदाधिकारी व शेतकर्‍यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांनी केले आहे.

मुंबईत मोर्चाला सकाळी 11 वाजता मस्जिद बंदर रेल्वे स्टेशन येथून प्रारंभ होणार आहे. मोर्चा छत्रपती शिवाजी टर्मिनससमोरील आझाद मैदानावर जाईल. तेथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाचे विविध संघटना, तसेच संस्थांच्या वतीने नियोजन सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण नसल्याने समाजातील तरुणांची अवस्था आर्थिकदृष्ट्या हलाखीची होऊन बेरोजगारी वाढली आहे. शेती व्यवस्था उद्ध्वस्त झाल्याने समाजातील तरुण हवालदिल झाला आहे. म्हणून आर्थिक दुर्बल मराठा समाजाला आरक्षण मिळवून न्याय देण्यासाठी 4 एप्रिल रोजी होणार्‍या मुंबईतील मंत्रालयावरील मोर्चास व आझाद मैदानावरील जाहीर सभेस सर्वांनी उपस्थित रहावे, असे कोंढरे यांनी सांगितले. यानिमित्ताने त्यांनी नगर जिल्ह्याच्या दौर्‍यात अकोले तालुक्यातील मराठा समाज कार्यकर्त्यांची नुकतीच भेट घेऊन मराठा आरक्षणासंबंधीची भूमिका पटवून दिली. मागणी मान्य केली नाही, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

मराठा समाजाची स्थिती अतिशय विदारक - राजर्षी शाहू महाराज यांनी या देशात 1902 साली मराठा समाजासह अनेक समाजांना आरक्षण देऊन सामाजिक अभिसरणाची व वंचितांना न्याय देण्याची भूमिका घेतली. आज समाजाची स्थिती अतिशय विदारक आहे. मूठभर र्शीमंत वर्ग सोडला, तर मराठा समाजातील बहुसंख्य गरीब आहेत. आरक्षण देण्यासाठी तरुणांत असंतोष आहे. छत्रपती घराण्याचा वंशज या नात्याने मराठा समाजासाठी कार्य करीत आहोत.’’ छत्रपती संभाजी महाराज, कोल्हापूर.

शासन मराठा समाजाची फसवणूक करतंय..- शासन फक्त आश्वासने देऊन मराठा समाजाची फसवणूक करीत आहे. मुंबईतील नियोजित मोर्चाचा परिणाम म्हणून राज्य सरकारने राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण समितीचे गठण केल आहे. तीन महिन्यांत अहवाल सादर करण्यास शासनाने समितीला सांगितले आहे. सरकारचा हा वेळकाढूपणा आहे. आमच्या सहनशिलतेचा अंत झाला आहे.’’ शांताराम कुंजीर, कार्याध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, पुणे.