आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आबांना मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्या : टकले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- माजी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री आर. आर. पाटील हे ग्रामस्वच्छता अभियानाचे प्रणेते होते. त्यामुळे त्यांना राज्य सरकारने मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवावे, अशी मागणी अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. कृषिराज टकले यांनी केली आहे. याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून या पुरस्कारासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही डॉ. टकले यांनी सांगितले.
डॉ. टकले यांची नुकतीच अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली. या निवडीनंतर संघाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला. त्या वेळी बोलत होते. डॉ. टकले म्हणाले, माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी राज्यात ग्रामस्वच्छता अभियान राबवले. तंटामुक्ती ग्राम योजनेचे निर्मातेही तेच होते. त्यामुळे आबा हेच खऱ्या अर्थाने ग्रामस्वच्छता तंटामुक्ती योजनेचे प्रणेते आहेत.
नाशिक येथे मराठा सेवा संघाचे दहावे अधिवेशन होत आहे. संघाचे संस्थापक अध्यक्ष विजयसिंह महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या या अधिवेशनात हा ठराव करण्यात येईल. त्यानंतर महाराष्ट्र शासनाला पाटील यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यासाठी मागणी करणार आहोत, असेही डॉ. टकले यांनी या वेळी सांगितले.