आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उर्दूप्रमाणेच मराठीतही गझलांचा मोठा खजिना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - उर्दूप्रमाणेच मराठी साहित्य हा मोठा ठेवा आहे. पु. ल. देशपांडे, मंगेश पाडगावकर, शिवाजी सावंत, व. पु. काळे, सुरेश भट, कुसुमाग्रज यांच्यासारख्या साहित्यिकांनी भरपूर लेखन केले आहे. सुरेश भट्टांनी, तर प्रेषितांवरसुद्धा मराठीत कविता केली आहे. मराठी साहित्यात उर्दूसारख्याच गझलांचा खजिना आहे, असे प्रतिपादन उर्दू साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष अनिस शेख यांनी केले.

नवरात्रानिमित्त मखदूम सोसायटीच्या गझल ग्रूपच्या वतीने "शामे गझल'चे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक फय्याज शेख, कवयित्री डॉ. कमर सुरूर राजूभाई शेख उपस्थित होते.

अनिस शेख म्हणाले, अहमदनगरमध्ये मुशायरे गझलांच्या कार्यक्रमांना फार जुना इतिहास आहे. अकबर बादशहाच्या नवरत्नातील एका रत्नाने अहमदनगर येथे मुशायरे आयोजित केले होते. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एका मुशायऱ्याचे उदघाटन केले होते. अशा इतिहासाला धरूनच मखदूम सोसायटी गझल ग्रूपच्या माध्यमातून गणेशोत्सव नवरात्र पर्वामध्ये उर्दू मुशायरे शामे गझलसारखे साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करून राष्ट्रीय एकात्मतेला बळ देण्याचे कार्य करत अाहे.

शामे गझलमध्ये डॉ. शेख रिजवान कादरी, अयाज गफूर, तन्वीर चष्मावाला, एजाज शेख, नौशिना शेख, डॉ. शमा शेख, शेख आदिल, शेख विकार, हसरत खान, नजमुसहर बाजी, मुन्नवर हुसेन, नफिसा हया, आसिफ सर, डॉ. परवेज, फिरोज, नईम सरदार, विनायक पवळे, दिलीप पांढरे, ऋता ठाकूर, शेख तारीक, सय्यद अफजल, शाकीर सर, बिलाल अहेमद, मुशताक सर, हबीब शेख आदींनी गजला सादर केल्या. रसिकांनी त्यांना मोठी दाद दिली.

प्रास्ताविक शफाकत सय्यद यांनी केले. सूत्रसंचालन आबिद दुलेखान यांनी केले, तर आभार तारीक शेख यांनी मानले. या कार्यक्रमास शहरातील रसिक उर्दु भाषेचे जाणकार उपस्थित होते.

एकमेकांशी उर्दूत बोला
ध्यक्षस्थानावरूनबोलताना कवयित्री डॉ. कमर सुरूर म्हणाल्या, दर तीन महिन्याला मखदुम सोसायटीने उर्दू साहित्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्यास उर्दूचा रसिकवर्ग वाढेल. एकमेकांशीही उर्दूमध्ये बोलण्याचा प्रयत्न करायला हवा, जेणे करून आमच्याही संभाषणात शब्दांची भर पडेल.
बातम्या आणखी आहेत...