आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलाक्षेत्रातील नगरचा मानबिंदू हरपला, गांधीवादी, ग्रंथप्रेमी, तत्त्वचिंतक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- तत्त्वचिंतक, सर्जनशील कलाकार, ग्रंथप्रेमी, कुटुंबवत्सल पती, वडील अशा अनेक गुणांचा समुच्चय म्हणजे थोर रंगकर्मी सदाशिव अमरापूरकर. पडद्यावर खलनायक म्हणून असलेला प्रचंड दरारा घरगुती गप्पांच्या मैफलीत कुठेच जाणवत नसे.
खेड्यातील सुविधांचा अभाव, शेतकऱ्यांची दुरवस्था, शिक्षणाची परवड, मराठी वाचन संस्कृतीचा -हास, अंधश्रद्धा, व्यसनात वाहवत चाललेली युवा पिढी, तिला बहकवणारे निगरगट्ट राज्यकर्ते, त्यांचा भ्रष्टाचार, नैतिक अधोगती यावर ते तळमळीने बोलत. खासगीत आणि समारंभातही. पडद्यावरचे अमरापूरकर हेच का, असा प्रश्न तेव्हा पडे. ग्रंथप्रेम हा त्यांचा वीक पॉइंट. हजारो पुस्तकांचा संग्रह त्यांच्याकडे होता. सेटवर रिकामा वेळ मिळाला की, ते वाचन करत व इतरांनाही आग्रहाने पुस्तके वाचण्यास सूचवत. गांधीवादी विचारसरणीचा त्यांच्यावर इतका प्रभाव होता की, ते स्वत: सूत कातण्यास शिकले. खेडोपाडी कुठेही गेले, तरी कार्यकर्त्यांच्या घरी राहत. त्यांच्या घरचे साधे जेवण घेत आणि त्यांच्या कुटुंबाची आस्थेने चौकशी करत. त्यांच्या मुलाबाळांत आजोबा बनून रमून जात.
राज्यकर्त्यांना त्यांच्या चुकांबद्दल जाहीर सभेत एकाच मंचावर सुनावण्याची अमरापूरकरांची खासियत होती. अण्णा हजारे, मेधा पाटकर, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची बाजू ते पोटतिडकीने मांडत. त्यांनी कधीच कुणाकडे स्वत:साठी काही मागितले नाही. चित्रपटक्षेत्रात यशोशिखरावर असतानाच मेधा पाटकर, अनिल अवचट, डॉ. दाभोलकर यांच्या सहवासात आल्याने समाजाचे खरे प्रश्न त्यांना समजले आणि त्यांनी फिल्मी दुनियेतील कामे आवरती घेत या सर्वांच्या सामाजिक कार्यात तळमळीने भाग घेतला. नवनवीन युवा रंगकर्मींबद्दल त्यांना कायम आस्था होती. राजकुमार तांगडे, नागराज मंजुळे यांच्या कामाचे, तर त्यांना प्रचंड कौतुक होते.
शेवगावच्या हौशी रंगकर्मींच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील एकांकिकेचा प्रयोग त्यांनी नगरला गेल्याच वर्षी स्वत:च्या घरातील हॉलमध्ये आयोिजत केला होता. कलाकारांचे मन:पूर्वक कौतुक करत दरवर्षी दिवाळीला मला तुम्ही एक नवी एकांकिका दाखवायची, असा प्रेमळ आदेशही दिला होता.
सर.. आम्ही तयार आहोत.पण तुम्ही कुठे आहात सर...? पडदा उघडण्याच्या वेळी असा पडदा कसा पाडलात?
- उमेश घेवरीकर, शेवगाव.
गुणीजनांचा सहृदय चाहता...
अमरापूरकरांचं नाटकाचं वेड, रात्र रात्र नगरमध्ये फिरणं, पानाच्या टपरीवर थांबणं हे सगळं नगरमध्ये असताना मी अनुभवलं. ह्यआिदमह्ण नावाचं एक कवितेला वाहिलेल्या हस्तलिखिताच्या संपादन मंडळात त्यांचं नाव असायचं. या सगळ्या गोष्टींमुळे मीही नकळत त्यांच्याकडे आकर्षित झालो.
विश्वास पाटलांच्या "जन्मठेप' चित्रपटात माझी गाणी होती. संगीत राम कदम यांचं होतं, तर ती गायली होती आशा भोसले यांनी. या िचत्रपटात अमरापूरकर व अिश्वनी भावे होती. त्यांची ओळख या चित्रपटामुळे द्विगुणित झाली. पुढे अमरापूरकरांचं मला पत्र आलं की, तुम्ही मुंबईला या. पत्ता िदला होता - वर्सोवा, अंधेरी. मी त्यांच्याकडे गेलो तेव्हा ते बर्मुडा घालून बसले होते. मी थोडा दबकतच गेलो, पण त्यांच्या मनमोकळ्या स्वभावामुळं सगळं दडपण िनघून गेलं. जुन्या आठवणी निघाल्या. त्यांच्याबरोबर जेवणही केलं. रात्री सिनेमाच्या संदर्भात बोलणं झालं. त्यांनी मला विचारलं, घरी राहणार की हॉटेलात. मी म्हटलं घरी. रोज सकाळी सात वाजता ते बाहेर पडायचे. मीही त्यांच्याबरोबर गाडीत असायचो. एकदा शुटींगसाठी मेकअप सुरू होता. मेकअप रुमचं दार उघडलं गेलं. एकजण आत आला. त्याने अमरापूरकरांना वाकून नमस्कार केला. तो शाहरूख खान होता!
वर्सोवा येथील त्यांच्या ऑफिसमध्ये नगरकडच्या गप्पा व्हायच्या. पुढे त्यांनी "पैंजण' या चित्रपटाची गाणी लिहिण्यासाठी मला बोलावलं. हैदराबाद येथील कांबळी नावाच्या निर्मात्यानं अमरापूरकरांवर चित्रपटाची मदार सोपवली होती. त्याच दिग्दर्शन अजय सरपोतदार करत होते. त्यांनी जगदीश खेबुडकरांना गाणी दिली, तर अमरापूरकरांनी मला. नंतर असं ठरलं निम्मी गाणी मी लिहायची आणि निम्मी खेबुडकरांनी. अमरापूरकरांची राहणी खूप साधी. घरातलं घरपण अगदी आपल्यासारखं. त्यांना वाचनाचं भारी वेड. शुटींगला जाताना आम्ही साहित्य सहवासमध्ये जायचो. सुभाष भेंडे यांच्याकडून पुस्तके घेऊन पुढे निघायचो.अमरापूरकरकरांनी स्वत:च नाव अतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवलं आहे. ते कधीही पुसलं जाणार नाही...
- प्रकाश घोडके, कवी.