आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Language Use For Court Day To Day Work Judge Shrikant Kulkarni

न्यायालयीन कामकाजासाठी मराठीचा सुयोग्य वापर करावा - सत्र न्यायाधीश श्रीकांत कुलकर्णी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: जिल्हा न्यायालयाच्या वतीने सुयोग मंगल कार्यालयात 'न्यायालयीन प्रकरणांमध्ये मराठी भाषेचा परिणामकारक वापर' ही कार्यशाळा झाली. प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीकांत कुलकर्णी अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
नगर - महाराष्ट्रातील संतांनी मराठी भाषा समृद्ध केली. न्यायिक अधिकाऱ्यांनी मराठीतून निर्णय देताना, तसेच वकिलांनी न्यायालयीन कामकाजासाठी या समृद्धतेचा योग्य वापर करायला हवा. न्यायालयीन कर्मचाऱ्यांनीसुद्धा मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करून न्यायालयीन कामकाज सुलभ होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीकांत कुलकर्णी यांनी केले.

जिल्हा न्यायालयाच्या वतीने सुयोग मंगल कार्यालयात बुधवारी सायंकाळी न्यायालयीन प्रकरणांमध्ये मराठी भाषेचा परिणामकारक वापर करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद््घाटन कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन सरस्वती पूजन करण्यात आले. प्रास्ताविक शहर वकील संघाचे अध्यक्ष अॅड. एम. एम. पाटील यांनी केले.

कार्यशाळेत जिल्हा न्यायाधीश व्ही. बी. कुलकर्णी, जिल्हा सरकारी वकील अॅड. सतीश पाटील, सी. जे. बोरुडे, सेवानिवृत्त प्राचार्य खासेराव शितोळे इतर वक्त्यांनी न्यायालयीन प्रकरणांमध्ये मराठी भाषेचा परिणामकारक वापर कसा कोणत्या पद्धतीने करता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन दिवाणी न्यायाधीश ए. व्ही. कुलकर्णी यांनी केले. मुख्य न्यायदंडाधिकारी एस. एस. जगताप यांनी आभार मानले. कार्यशाळेला मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, विधिज्ञ न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.