आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
नगर- नवी दिल्लीत होणार्या एकेचाळीसाव्या बृहन्महाराष्ट्र मराठी नाट्य स्पर्धेसाठी नगरमधील ज्येष्ठ रंगकर्मी पी. डी. कुलकर्णी यांची परीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. ‘दिल्ली महाराष्ट्रीय शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थे’च्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अशा प्रकारचा बहुमान मिळणारे कुलकर्णी हे नगरमधील पहिलेच रंगकर्मी आहेत.
27 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीत पहाडगंज परिसरातील महाराष्ट्र रंगायन येथे ही स्पर्धा होत आहे. कुलकर्णी हे नगरच्या रंगभूमीवर गेली 40 वष्रे कार्यरत आहेत. गेल्या 10 वर्षांपासून राज्य नाट्य स्पर्धेचे परीक्षक म्हणून त्यांना आमंत्रित केले जाते. गेल्या वर्षी नांदेड येथे झालेल्या 52 व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी त्यांना परीक्षक म्हणून शासनाने नियुक्त केले होते.
नगरमधील नाट्य चळवळ सकस होण्यासाठी कुलकर्णी सातत्याने प्रयत्नशील आहेत. विविध स्पर्धांच्या आयोजनात त्यांनी योगदान दिले आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल नगरच्या नाट्यवतरुळात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. नाट्य परिषदेची जिल्हा शाखा, रंगकर्मी प्रतिष्ठान, हाऊसफुल्ल प्रतिष्ठान, कलायात्रिक, नाट्यजल्लोष, अक्षर प्रतिष्ठान, जिप्सी प्रतिष्ठान, सप्तरंग, संघर्ष युवा प्रतिष्ठान या संस्थांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.