आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: शिर्डीत ड्रेनेज चेंबरमध्ये गुदमरून चौघांचा मृत्यू, एक थोडक्यात बचावला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी - ड्रेनेज लाइन चेंबरमध्ये टाकलेल्या इलेक्ट्रिक मोटारीच्या फुटबॉलमधील कचरा काढण्यासाठी आत उतरलेला एक शेतकरी आणि तो गुदमरत असल्याचे पाहून ड्रेनेजमध्ये एकामागे एक उतरलेले तिघे अशा चौघांचा गुदमरून मृत्यू झाला. एकाची प्रकृती गंभीर अाहे. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास शिर्डी येथील शिंदे-शेळके वस्तीजवळ घडली.

शिर्डीतील मुख्य ड्रेनेज लाइनमधूनच ड्रेनेज फिल्टर प्लँटकडे जाणारी मुख्य पाइपलाइन जाते. या पाइपलाइनमधून शेतकरी इलेक्ट्रिक पंपाद्वारे शेतीसाठी पाणी वापरतात. शुक्रवारी सकाळी सखाराम बाबूराव शिंदे (वय ५५) हे इलेक्ट्रिक पंपाच्या फुटबॉलला अडकलेला कचरा काढण्यासाठी ड्रेनेज लाइनच्या दहा फूट चेंबरमध्ये उतरले. मात्र आतील गॅसमुळे सखाराम यांचा श्वास गुदमरू लागला. हे पाहून तेथे असलेले नवनाथ भाऊसाहेब शेळके सखारामला वाचवण्यासाठी चेंबरमध्ये उतरले. मात्र गुदमरून ते बेशुद्ध पडले. अारडाअाेरड सुरू झाली तेव्हा बंडू मिंधार व आनंदा गोपीनाथ मोरे हेही चेंबरमध्ये उतरले. हे चाैघेही चेंबरमध्येच बेशुद्ध पडून गतप्राण झाले. सचिन कचरू नाईकवाडी हा तरुणही मदतकार्यात धावला; परंतु तो बेशुद्ध पडला. वरच्या बाजूलाच गॅसच्या उग्र वासामुळे त्याला चक्कर आली. त्याला उपस्थितांनी तातडीने बाजूला घेतले. या सर्वांना बाहेर काढण्यासाठी चेंबरजवळ एक मोठा खड्डा खाेदून नंतर चेंबर तोडण्यात आले. या चेंबरच्याच तळाला चारही मृतदेह आढळून अाले. साई संस्थानच्या आपत्कालीन यंत्रणेने ऑक्सिजनचे मास्क तोंडाला लावून चेंबरमध्ये उतरून मृतदेह बाहेर काढले.

पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज....
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...