आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाजार समितीतील १२५ दुकाने बंद, दीड कोटीहून अधिक उलाढालीवर परिणाम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शासनाने भाजीपाला आणि फळे हे बाजार समितीच्या नियमनातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. याविरोधात राज्यातील बाजार समित्यांनी बंद पुकारत विरोध नोंदवला. नगर कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व १२५ दुकाने बंद असल्यामुळे दररोज होणाऱ्या दीड कोटींच्या व्यवहारावर परिणाम झाला.
नव्या कायद्यामुळे शेतकऱ्यांना भाजीपाला फळे थेट ग्राहकांना विकता येतील. त्यामुळे बाजार समितीत द्यावी लागणारी आडत, हमाली वाचणार आहे. शेतकऱ्यांना त्याच्या मालाची किंमत ठरवण्याचाही अधिकार मिळाला आहे. तथापि, याचा परिणाम बाजार समितीतील उलाढालींवर होणार आहे. त्यामुळे या निर्णयाविरोधात राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी पुकारलेल्या बंदमध्ये नगर बाजार समितीही सहभागी झाली.

सोमवारी हमाल पंचायततर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदाेलन करण्यात आले. पंचायतचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले, बाबा अरगडे, अॅड. लक्ष्मण वाडेकर, मधुकर केकाण, गोविंद सांगळे आंदोलनात सहभागी झाले होते. बाजार समितीच्या आवारातील फळे, भाजीपाला विभागातील नेप्ती उपबाजार समितीतील १२५ दुकाने बंद होती. घुले यांच्या नेतृत्वाखाली हमालांनी बाजार समितीतील हमाल पंचायत भवन ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढला. सरकारने शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव द्यावा, पण हा निर्णय घेऊ नये; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा घुले यांनी दिला.

कृषी उत्पन्न बाजार समिती नियमनातून फळे, भाजीपाला आदी शेतमाल वगळण्याचा अध्यादेश मागे घेण्याच्या मागणीसाठी जिल्हा हमाल पंचायतच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावे‌ळी शासनाचा निषेध करण्यात आला.

पैशांची हमी कोण घेणार?
^बाजार समितीतील दुकानांमध्ये फळे, भाजीपाला विकला, तर शेतकऱ्यांच्या पैशांना आडत्या आणि बाजार समिती जबाबदार असते. शेतकऱ्यांनी बाहेर माल विकला आणि त्या मालाचे पैसे संबंधितांनी दिले नाहीत, तर त्याला जबाबदार कोण? हमाल, मापाडी ही शेतकऱ्यांचीच मुले आहेत. त्यांच्या कुटुंबाचाही विचार केला जावा. समितीने योग्य तो निर्णय घ्यावा.'' हरिभाऊकर्डिले, सभापती, बाजार समिती, नगर.
बातम्या आणखी आहेत...