आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाव कमी झाल्याने आंबा सामान्यांच्या आवाक्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- फळांचा राजा असलेल्या अांब्याचे नगरच्या बाजारात आगमन झाले आहे. केरळ, चेन्नई, हैदराबाद, तसेच रत्नागिरीहून होणारी आवक जास्त असल्याने सर्वसामान्यांना परवडतील अशा दरांत आंबे उपलब्ध आहेत. मागील वर्षीच्या दरांच्या तुलनेत दर निम्म्याने कमी आहेत. त्यामुळे ग्राहकांकडून चांगली मागणी आहे.
अवकाळी पावसात गावरान आंब्यांचे नुकसान झाले असले, तरी हापूस व अन्य कलमी अांब्यांचे उत्पादन जास्त आहे. चांगल्या गुणवत्तेचा अांबा बाजारात उपलब्ध झाला आहे. मागील चार दिवसांत दहा ते बारा ट्रक अांब्यांची शहरात आवक झाली. एका ट्रकमध्ये साडेसहाशे पेट्या असतात. एका पेटीत दोन ते अडीच डझन आंबे असतात. लालबाग अांब्याला चांगली मागणी आहे.
भाव आणखी कमी होण्याची शक्यता...
शहरात आंब्यांची आवक वाढत असल्याने पुढच्या आठवड्यात अांब्यांचे भाव अाणखी कमी होण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाचा अांब्यांच्या आवकेवर कोणताही परिणाम झालेला नाही. मागील वर्षीच्या तुलनेत निम्म्या किंमतीत अांबा विकला जात आहे.'' पप्पू अाहुजा, अांबा विक्रेता, नगर.