आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षय्य तृतीयेनिमित्त बाजारपेठ झाली सज्ज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या सोमवार (13 मे) मुहर्तावर नगरच्या बाजारात सुमारे 20 कोटींची उलाढाल होणार आहे. दरम्यान, सोन्याच्या भावात सध्या मोठय़ा प्रमाणात घसरण झाल्याने सराफ बाजारात सोने खरेदीसाठी झुंबड उडणार आहे.

अक्षय्य तृतीच्या दिवशी सोने-चांदी, वाहन, घर, तसेच जमीन खरेदी करणे व नवीन वास्तूत प्रवेश करणे शुभ मानले जाते. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर वाहन तसेच सोन्या-चांदीच्या बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणात उलाढाल होणार असल्यामुळे बाजारपेठ सज्ज झाली आहे. अक्षय्य तृतीयेसाठी वाहन बाजारात विविध कंपन्यांच्या दुचाकी व चारचाकी वाहने दाखल झालेली आहेत. तसेच सराफ बाजारात विविध प्रकारचे दागिने विक्रीसाठी आलेले आहेत. अक्षय्य तृतीयेमुळे अनेकांनी मागील दहा दिवसांपासूनच वाहने बुकिंग केली आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सोन्याचा भाव 10 ग्रॅमला 27 हजार 200 रुपये होता, तर चांदीचा भाव किलोला 62 हजार रुपये झाला होता. मात्र, मागील काही दिवसांपासून सोन्याच्या भावात सातत्याने घसरण होत आहे. गेल्या महिन्यात 10 एप्रिल रोजी सोन्याचा भाव 29 हजारांवर गेला होता. त्यानंतर सातत्याने भावात घसरण होत गेली.सोन्याच्या भावात एप्रिल महिन्यात मोठी घसरण झाली होती. एप्रिलमध्ये सोने 26 हजारांवर गेले होते. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला होता. रविवारी (12 मे) रोजी सोन्याचा भाव 27 हजार 800 होता. सोने, वाहन खरेदीतून 20 कोटींची उलाढाल होईल, असा अंदाज आहे.

7 कोटींची उलाढाल होणार
सोन्याच्या भावात घसरण झाल्याने सोमवारी नगरच्या सराफ बाजारात ग्राहकांची सोने खरेदीसाठी झुंबड उडणार आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सराफ बाजारातून 7 कोटींची उलाढाला होईल. भावातील घसरणीमुळे ग्राहकांमध्ये सध्या सोने खरेदीसाठी चांगला उत्साह आहे.’’ संतोष वर्मा, अध्यक्ष, सराफ असोसिएशन

चांदीचा भाव स्थिर
तीन वर्षांपूर्वी चांदीचा भाव किलोमागे 75 होता. त्यानंतर हा भाव 60 हजार आला.सध्या चांदीचा भाव 46 हजार 500 इतका आहे. तीन वर्षांपूर्वी चांदीचा भाव 75 गेल्यामुळे ग्राहकांनी मोठय़ा प्रमाणात चांदीत गुंतवणूक केली होती.

ठेवी काढून सोने खरेदी
सोन्याच्या भावात घसरण झाल्याने बँकेतील ठेवी काढून ग्राहक सध्या सोन्यात मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक करताना दिसत आहेत. त्याचा मोठा फटका बँका व पतसंस्थांनाही बसत आहे. मोठय़ा प्रमाणात बँक ग्राहक बँकेतून ठेवी काढत आहेत.