आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवार्ता: सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - सासरी नांदत असताना पैशांसाठी होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली, अशी फिर्याद तिच्या वडिलांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात दिली. हा प्रकार दोन दिवसांपूर्वी नगर तालुक्यातील गुंडेगावातील हराळ मळ्यात घडला. दिगंबर काशिनाथ धनवटे (४५, जेऊर हैबती, ता. नेवासे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांची मुलगी सासरी नांदत असताना सासरचे लोक तिच्याकडे पैशांची मागणी करायचे. शारीरिक मानसिक छळाला कंटाळून मुलीने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत जीवनयात्रा संपवली. पोलिसांनी बालाजी ज्ञानदेव येठेकर, कस्तुराबाई ज्ञानदेव येठेकर, तारा ईश्वर लष्करे, मनीषा संतोष माने यांच्याविरुद्ध विवाहितेचा छळ आदी कायदा कलमान्वये गुन्हा नोंदवला. तपास उपनिरीक्षक आर. ए. परदेशी करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...