आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मसाला चित्रपटाचे नगरमध्ये चित्रीकरण

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - काही मराठी चित्रपट केवळ हौसेसाठी बनवले जातात. चित्रपट बनवतानाच हौस पूर्ण होते. त्यामुळे तळागाळापर्यंत चित्रपट पोहोचवण्याची तसदी कोणी घेत नाही. परिणामी उत्कृष्ट चित्रपटाची निर्मिती कमी होत असल्याची खंत ‘मसाला’ चित्रपटाचे दिग्दर्शक संदेश कुलकर्णी यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
उमेश कुलकर्णी यांच्या आभारभाट निर्मितीच्या मसाला चित्रपटाचे चित्रीकरण सध्या नगरमध्ये सुरू आहे. त्यासाठी संदेश कुलकर्णी येथे आले आहेत. रविवारी तुषार गार्डन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी चित्रपटाचे निर्माते उमेश कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी उपस्थित केले.
संदेश कुलकर्णी म्हणाले, प्रवीण मसालेचे संस्थापक हुकुमीचंद चोरडिया आणि त्यांच्या पत्नी कमलाबाई यांच्या आयुष्यासंबंधी हा चित्रपट आहे. विहीर, देऊळनंतर एक परिपूर्ण चित्रपट देण्याचा प्रयत्न आहे. या चित्रपटात गिरीश कुलकर्णी, अमृता सुभाष, दिलीप प्रभावळकर, डॉ. मोहन आगाशे आदी कलाकार आहेत.