आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कतार येथील मास्टर्स चेस स्पर्धेत नगरचा शार्दूल ज्युनियर चॅम्पियन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - कतार येथे झालेल्या मास्टर्स चेस स्पर्धेत नगरचा शार्दूल गागरे ज्युनियर चॅम्पियन ठरला. जगातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या ओपन ग्रँड मास्टर स्पर्धेत शार्दूलने त्याच्यापेक्षा अधिक रेटींगच्या बुद्धिबळपटूना नमवत ज्युनियर चॅम्पियनशिप पटकावली.
या स्पर्धेत मॅगनस कार्लसन सिनियर चॅम्पियन ठरला. स्पर्धेच्या पूर्वतयारी सहभागासाठी शार्दूलला जिल्हा बुध्दिबळ असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांचे सहकार्य लाभले. या स्पर्धेत शार्दूलने पहिल्या डावात चीनचा ग्रँडमास्टर व्ही. ई. (रेटिंग २७३०) याच्यावर मात केली. रशियाचा ग्रँडमास्टर खैरुद्दीन इद्दार (रेटिंग २६४७) याच्याविरूद्ध काळ्या सोंगट्या घेऊन खेळताना शार्दूलने त्याचा व्या डावात पराभव केला. या स्पर्धेत सहभागी होताना शार्दूलचे रेटिंग २४७० होते. एकूण डावात गुण मिळवून तो ज्युनियर चॅम्पियन ठरला. त्याने तिसरा शेवटचा ग्रँडमास्टर नॉर्म पूर्ण केला आहे. त्याचे रेटिंग २४९७ झाले असून ग्रँडमास्टर होण्यासाठी त्याला आणखी तीन गुणांचे रेटिंग कमी आहे. सध्या त्याची देशातील रँक २७, एशियन रँक ८४, तर जागतिक रँक ७९२ आहे. ग्रँडमास्टर स्विर्झंलँड पिटर (रेटिंग २७४०) याने शार्दूलच्या सर्व खेळाचे समालोचन करताना त्याचे कौतूक करत तो लवकरच रेटिंगमध्ये मोठी भरारी घेईल, असा विश्वास व्यक्त केला.
बातम्या आणखी आहेत...