आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maulana Azad Anniversary Celebrate At Bhuikot Fort

भुईकोट किल्ल्यात साजरी झाली मौलाना आझादांची जयंती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - देशाचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना आझाद यांना मंगळवारी भुईकोट किल्ल्यात झालेल्या कार्यक्रमात आदरांजली अर्पण करण्यात आली. भारताची शैक्षणिक प्रगती व तरूणांच्या प्रशिक्षणाची गरज लक्षात घेऊन मौलाना आझाद यांनी देशाचे शैक्षणित धोरण आखले.
शिक्षणाला राष्ट्रीय प्रवाहाचे साधन म्हणून त्यांनी अंमलात आणल्याने शिक्षणक्षेत्रात मोठी क्रांती होऊन शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली झाली, असे प्रतिपादन अनिस शेख यांनी यावेळी केले.
राजूभाई मित्रमंडळाच्या वतीने मौलाना आझादांची जयंती मंगळवारी भुईकोट किल्ल्यात साजरी करण्यात आली. चले जाव आंदोलनात मौलाना आझाद अखिल भारती काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष असताना त्यांच्यासह पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आदी १२ जणांना नगरच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात १९४२ ते ४५ या काळात ठेवण्यात आले होते. त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी भिंगार काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. आर. आर. पिल्ले, नगरचे शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, डॉ. सादीक शेख, शेख आफाक, शेख खुर्शीद, आबीद खान, शेख नईम सरदार, शेख आसीम आदी उपस्थित होते.
अनिस शेख पुढे म्हणाले, देशाच्या अंदाजपत्रकात शिक्षणाला महत्त्वाचे स्थान देणे आवश्यक आहे. अन्न, वस्त्रानंतर शिक्षणाचा क्रम लावला पाहिजे, असे मौलाना आझाद यांचे मत होते. देशाच्या पंचवार्षिक योजनेचा हेतू केवळ शेती, उद्योग, वीज, दळणवळणाची साधने यांची प्रगती एवढाच असू नये. नव्या पिढीची जडण-घडण योग्य प्रकारे होण्यासाठी शिक्षणाकडेही लक्ष दिले पाहिजे. देशात अनेक नव्या संस्था मौलाना आझाद यांनी सुरू केल्या, असेही त्यांनी सांगितले.