आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मायंबा यात्रेची कुस्त्यांच्या हगाम्याने झाली सांगता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथर्डी- श्रीक्षेत्र मायंबा यात्रेची सांगता कुस्त्यांच्या हगाम्याने झाली. सध्या बीजोत्सवाची तयारी आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर महाप्रसादाची तयारी देवस्थान समितीची सुरू आहे. कुस्त्यांसाठी बीड, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर आदी ठिकाणांहून मल्लांची हजेरी होती.

मत्स्येंद्रनाथांनी पौष अमावास्येला संजीवन समाधी घेतली म्हणून या दिवशी मुख्य यात्रा होऊन कुस्त्यांच्या हगाम्याने सांगता होते. भाविकांकडून नवसाच्या कुस्त्या लावल्या जातात. देवस्थान समिती व ग्रामस्थांकडून मल्लांना बिदागी दिली जाते. किरकोळ वादावादी वगळता हगामा शांततेत पार पडला. देवस्थान समितीचे अध्यक्ष दादासाहेब चितळे, सचिव बाबासाहेब म्हस्के, राजेंद्र म्हस्के, नवनाथ म्हस्के, अनिल म्हस्के आदींनी मान्यवरांचे स्वागत केले. नाथांची सेवा म्हणून विनामोबदला खेळणाऱ्या मल्लांची संख्या यंदा खूप वाढल्याने सायंकाळी उशिरािपर्यंत कुस्त्यांचा फड रंगला. विविध गावांच्या मल्लांमध्ये शाब्दिक चकमकीमुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण बनले. देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांनी समजूत काढून सर्वांना शांत केले. महाराष्ट्र केसरी सय्यद चाऊस यांचे दुपारी उशिरा आगमन झाल्याने त्यांची कुस्ती पाहण्यासाठी कुस्ती शौकिनांनी गर्दी केली.