आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पदभार स्वीकारण्यापूर्वीच महापौरांच्या पतिराजांची मनपात बैठक !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नूतन महापौर सुरेखा कदम यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नाही. तथापि, त्यांचे पतिराज संभाजी कदम यांनी मनपाची सूत्रे आधीच हाती घेतली आहेत. महापौर कदम दोन दिवसांनी (७ जुलै) पदभार घेणार असल्या, तरी त्यांच्या पतिराजांनी सोमवारी दुपारी महापौर कार्यालयात काही अधिकाऱ्यांची छोटेखानी बैठक घेतली. त्यामुळे महापौर सुरेखा कदम यांना स्वतंत्रपणे कारभार पाहता येईल का, असा प्रश्न आतापासूनच उपस्थित झाला आहे.
महापौरपद महिलेसाठी राखीव असून या पदावर शिवसेनेच्या कदम यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांना माहेर सासर दोन्हीकडूनही राजकीय वारसा मिळालेला आहे. त्यामुळे महापौरपदाचा पदभार घेतल्यानंतर त्या स्वतंत्रपणे मनपाचा कारभार पाहतील, अशीच नगरकरांची अपेक्षा आहे. परंतु जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतीप्रमाणेच महापालिकेतही आता "पतिराज' सुरू होण्याची शक्यता आहे. महापौर कदम यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नाही. गुरूवारी त्या पदभार घेणार आहेत, परंतु त्यांचे पतिराज संभाजी कदम यांनी त्यापूर्वीच मनपाची सूत्रे हाती घेतले असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. सोमवारी दुपारी त्यांनी महापौर दालनात अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे, शहर अभियंता विलास सोनटक्के, प्रकल्प अभियंता आर. जी. मेहेत्रे, पाणीपुरवठा विभागप्रमुख परिमल निकम यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. विशेष म्हणजे अतिरिक्त आयुक्त वालगुडे यांनीही या छोटेखानी बैठकीला हजेरी लावली. संभाजी कदम हे शिवसेनेचे शहरप्रमुख आहेत. अधिकाऱ्यांना महापौरांच्या दालनात बोलावून बैठक घेण्याची त्यांची पध्दत कितपत योग्य आहे, याची चर्चा मनपा वर्तुळात सुरू झाली आहे.

दुसऱ्या महिला महापौर
सुरेखाकदम यांच्या रूपाने शहराला दुसऱ्यांदा महिला महापौर मिळाल्या आहेत. यापूर्वी शीला शिंदे यांनी प्रथम महिला महापौर म्हणून अडीच वर्षे मनपाचा कारभार चालवला. माजी उपमहापौर गीतांजली काळे सुवर्णा कोतकर यांनीदेखील मनपाचा कारभार पाहिला आहे. त्यांच्या कारभारातही थोड्याफार प्रमाणात पतिराजांनी लक्ष घातले होते. नूतन महापौर सुरेखा कदम यातरी ही परंपरा मोडीत काढतील, अशी नगरकरांना अपेक्षा आहे. ती कितपत पूर्ण होते हे लवकरच दिसेल.
बातम्या आणखी आहेत...