आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mayor Sangram Jagtap,Latest News In Divya Marathi

स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर लोकार्पण; केडगाव उपनगरात मनपाचे अग्निशमन केंद्र सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर केडगाव उपनगरात अग्निशमन केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. माजी महापौर संदीप कोतकर यांच्या कार्यकाळात या केंद्राची उभारणी करण्यात आली होती. मात्र सेवा सुरू झालेली नव्हती. आता महापौर संग्राम जगताप व उपमहापौर सुवर्णा कोतकर यांच्या प्रयत्नामुळे या केंद्राचे शुक्रवारी लोकार्पण करण्यात आले.

याप्रसंगी आयुक्त विजय कुलकर्णी, महिला बालकल्याणच्या सभापती नसीम शेख, उपसभापती कलावती शेळके, नगरसेवक सुनील कोतकर, नगरसेविका सविता कराळे, सुनिता कांबळे आदी उपस्थित होते. यावेळी महापौर जगताप म्हणाले, माजी महापौर कोतकर यांच्या प्रयत्नांमुळे अग्निशमन केंद्र सुरू करता आले. मध्यवर्ती शहर व सावेडी उपनगरात मनपाची दोन अग्निशमन केंद्र आहेत, आता केडगावात देखील हे केंद्र सुरू झाले आहे. केडगाव देवी रस्ता, केडगाव पाणी योजनेचे काम सुरू आहे. उपमहापौर कोतकर व येथील नगरसेवकांनी प्रयत्न केले, त्यामुळेच हा प्रस्ताव महासभेत मंजुर करण्यात आला असल्याचे जगताप यांनी सांगितले. उपमहापौर म्हणाल्या, केडगाव परिसर विकसित होत आहे. अनेक नवीन वसाहती उभ्या राहत आहेत, शाळा- कॉलेज, मंगल कार्यालये, हॉटेल्स, अपार्टमेंटची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिसरातून नगर-पुणे महामार्ग गेला असून त्यावरून नेहमी ज्वलनशील पदार्थांची वाहतुक सुरू असते. त्यामुळे केडगाव उपनगरात अग्निशमन केंद्राची गरज होती. केंद्र सुरू झाल्यामुळे आगीच्या घटना तातडीने रोखता येतील. गेल्या 20 ते 25 वर्षात शहरात अग्निशमन केंद्राची निर्मिती झालेली नाही, ती सुविधा आता नागरिकांसाठी उपलब्ध झाली असल्याचे कोतकर यांनी सांगितले. अग्निशमन विभागप्रमुख शंकर मिसाळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रभाग अधिकारी एन. बी. गोसावी यांनी केले, तर महेंद्र कांबळे यांनी आभार मानले.

50 लाखांचा निधी
शासनाकडून मिळालेल्या 50 लाख रुपयांच्या निधीतून जुन्या मनपा इमारतीजवळील अग्शिमन केंद्रात यक्षम आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरू करण्यात येणार आहे. तसेच अत्याधुनिक यंत्रसामग्री देखील खरेदी करण्यात येणार असल्याचे आयुक्त विजय कुलकर्णी यांनी सांगितले. पारगमन बंद झाल्यानंतर निर्माण होणार्या अर्थिक प्रश्नाबाबतही त्यांची चिंता व्यक्त केली.