नगर- महापालिकेच्या माध्यमातून केडगावकरांची पाण्यासाठीची वणवण कमी करण्यात यश आले, असा दावा राष्ट्रवादीचे उमेदवार महापौर संग्राम जगताप यांनी केला. केडगाव येथील मोहिनीनगर, शिक्षक कॉलनी, कायनेटिक कॉलनी, आंबेडकर वसाहत, दूधसागर, कोतकर मळा परिसरात काढण्यात आलेल्या प्रचार फेरीदरम्यान ते बोलत होते. नगरसेवक सुनील कोतकर, मनोत कोतकर, सुजित काकडे, बाळासाहेब पठारे, शैलेश सुंबे, सचिन रोडे, संभाती सातपुते, तुषार टाक, भरत गारुडकर, प्रशांत भुसारे आदी यावेळी उपस्थित होते.
जगताप म्हणाले, महापालिकेच्या माध्यमातून केडगावमधील विविध विकासकामे मार्गी लावता आली. काही अर्धवट कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न प्राधान्याने करण्यात येत आहे. नागापूर पंपिग स्टेशन ते एकनाथनगर या 13 किलोमीटरमध्ये 600 मिलिमीटरची पाइपलाइन, ओमकारनगर, भूषणनगर, लोंढेमळा येथील पाण्याच्या टाक्यांची कामे पूर्ण होत आली आहेत. इंदिरानगर, ताराबाग कॉलनी, इंडस्ट्रियल इस्टेट भागासाठी लवकरच निधी मंजूर करून आणणार असल्याचे जगताप म्हणाले. केडगावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचा पुन:रुच्चार त्यांनी केला.