आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुयारी गटार योजनेसाठी 136 कोटींच्या निधीला तत्त्वत: मंजुरी, महापौर सुरेखा कदम यांची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महत्त्वाकांक्षी अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील भुयारी गटारीसाठी १३६ कोटींच्या निधीला तत्वत: मंजुरी मिळाली असल्याची माहिती महापौर सुरेखा कदम यांनी गुरूवारी दिली. अमृत योजनेच्या पहिल्या टप्प्यातील १०७ कोटींच्या निविदेलाही आठ-दहा दिवसांत अंतिम मंजुरी मिळणार आहे. त्याचबरोबर येत्या सहा महिन्यांत शहरासाठी मोठा निधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
नगर शहराला अमृत योजनेंतर्गत मोठा निधी उपलब्ध झाला आहे. वर्षभरापूर्वी पहिल्या टप्प्यातील पाणी योजनेसाठी शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. परंतु निविदा प्रक्रिया सरकारी लालफितीत अडकल्याने या कामास अद्याप सुरूवात झालेली नाही. या कामाच्या १०७ कोटींच्या निविदेला अंतिम मंजुरी मिळावी, यासाठी सत्ताधाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच साकडे घातले. येत्या आठ-दहा दिवसांत या निविदेला राज्याची अंंतिम मंजुरी मिळणार अाहे. दरम्यान, याच योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील भुयारी गटारीसाठी १३६ कोटींच्या निधीला तत्वत: मंजुरी देण्यात आली. त्यामुळे शहरासाठी अमृत अंतर्गत सुमारे तब्बल २४३ कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. त्यातून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या भुयारी गटारीच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. पहिल्या टप्प्यातील निधीतून पाणी योजना सक्षम होणार आहे. येत्या सहा महिन्यांत शहरासाठी मोठा निधी मिळणार असल्याचे महापौर कदम यांनी सांगितले. 
 
शहरात १२ हरित क्षेत्र विकास प्रकल्प 
अमृत योजनेंतर्गत शहरात हरित क्षेत्र विकास प्रकल्पासाठी केंद्राने एक कोटी ३५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. शहरातील अयोध्यानगर, आराध्य पार्क, गणपती मंदिर, कानडे मळा, मातोश्री उद्यान, तीर्थंकर कॉलनी, विरंगुळा मैदान, कर्डिले निवास, फुलेनगर, भूषणनगर, मधूबन कॉलनी, ताराबाग कॉलनी अशा १२ ठिकाणी हरित क्षेत्र विकास प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. 
बातम्या आणखी आहेत...