आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोखर्णा यांच्या विरोधात कर्मचाऱ्यांचा ‘एल्गार’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा रुग्णालयातील वादग्रस्त निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील पोखर्णा यांना येथून हटवा; अन्यथा आम्ही द्वितीय ते चतुर्थ श्रेणी कर्मचारी उपोषण करून रुग्णालय ठप्प करू. त्यांना येथे ठेवायचे असेल, तर आमचीच येथून बदली करा, अशा शब्दांत शनिवारी दिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आरोग्य सहसंचालक डॉ. पी. व्ही. बोरुटे यांना इशारा दिला. डॉ. पोखर्णा यांच्याबद्दल असलेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी डॉ. बोरुटे यांना नगरमध्ये यावे लागले. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासमोर अतिशय तीव्र शब्दांत आपल्या असंतोषाला वाट मोकळी करून दिली.
डॉ. पोखर्णांबाबत ते नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील ग्रामीण रुग्णालयात नेमणूक झाल्यापासून ते तेथे हजर राहत नसल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे सामान्यांना आरोग्य सेवा मिळत नव्हती. भारतीय जनसंसद संघटनेचे अध्यक्ष सुधीर भद्रे यांनी डॉ. पोखर्णा यांंच्याबाबत सातत्याने आरोग्य तक्रारी करून पाठपुरावाही केला होता. इतकेच नव्हे, तर त्यांची बदली चिचोंडी पाटील येथून जिल्ह्याबाहेर करण्यासाठी ग्रामसभेचा ठरावही करून पाठवण्यात आला. नगर तालुक्याच्या तहसीलदारांनी याबाबत नाशिकच्या आरोग्य उपसंचालकांनी तक्रारींची दखल घेत याबाबत चौकशी करून अहवाल पाठवण्याचा आदेश जिल्हा शल्य चिकित्सकांना दिला. मात्र, त्यांनी याबाबत काहीच केल्याने पुन्हा एक स्मरणपत्रही पाठवले. डॉ. पोखर्णा चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना अरेरावीची भाषा वापरत असल्याच्या जिल्हा रुग्णालयातील सर्व श्रेणीतील कर्मचारी, परिचारिका, क्लर्क, पॅरामेडिकल स्टाफने (तांत्रिक कर्मचारी) गंभीर स्वरूपाच्या तक्रारी केल्या, तरीही कार्यवाही झाल्याने अखेर डॉ. बोरुटे यांना नगरमध्ये यावे लागले.

शनिवारी सकाळी येऊन त्यांनी जिल्हा रुग्णालयाची झाडाझडती घेतली. त्यांनी कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांची बाजू ऐकून घेतली. त्यांनी डॉ. पोखर्णा कर्मचाऱ्यांशी कसे वागतात, बोलतात याची माहिती घेतली. त्यावर जिल्हा रुग्णालयातील सर्वच प्रकारच्या कर्मचाऱ्यांनी डॉ. पोखर्णांबाबत ते कर्मचाऱ्यांना अरेरावी, दादागिरी उद्धटपणाची वागणूक देत असल्याच्या तक्रारी केल्या. डॉ. बोरुटे यांनी त्यांना त्या लेखी देण्यास सांगितले. त्याप्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांनी तशा लेखी तक्रारी दिल्याची माहिती कर्मचाऱ्यांच्या महिला संघटनेच्या उपाध्यक्षा इंदिरा डुलगच यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली. शनिवारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय धाडगे, सोमनाथ पवार, मयूर राऊत, राजेंद्र गंधाडे आदींसह अनेक परिचारिका, कार्यालयीन कर्मचारी, तांत्रिक कर्मचाऱ्यांनी डॉ. बोरुटे यांच्यासमोर कैफियत मांडली. दरम्यान, डॉ. पोखर्णा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा फोन दुसऱ्या व्यक्तीकडे होता. ते परिषदेला गेल्याचे सांगितले. त्या व्यक्तीने संपर्कासाठी दिलेल्या दुसऱ्या क्रमांकावर संपर्क साधला असता, होऊ शकला नाही.
तक्रारी असतानाही निवासी वैद्यकीय अधिकारीपदी बढती

साळवे मृत्यू प्रकरणाचे पडसाद
परिचारिका शैला साळवे यांचा हृदय विकाराने मृत्यू झाल्यानंतर १४ ऑगस्ट रोजी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. साळवे यांचा मृत्यू कामाचा अतिताण त्यांना मिळालेली अमानवी वागणूक यांमुळे झाल्याचे स्पष्ट करत कर्मचाऱ्यांनी याबाबत डॉ. पोखर्णा यांना जबाबदार धरले होती. शनिवारी पुन्हा हा मुद्दा उपस्थित करत कर्मचाऱ्यांनी डॉ. बोरुटे यांना सर्व परिस्थितीची कल्पना दिली.

इतक्या तक्रारी असतानाही डॉ. पोखर्णा यांची नेमणूक जिल्हा रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून करण्यात आली. ज्या व्यक्तीबाबत अत्यंत गंभीर तक्रारी आहेत, अशा डॉ. पोखर्णांना बढती मिळाल्याने जिल्हा रुग्णालयाच्या वर्तुळात सर्वांनाच धक्का बसला. त्यात त्यांनी अधिकच उर्मटपणे वागणूक ठेवल्याने कर्मचाऱ्यांचा असंतोष अधिक उफाळून आला.

कर्मचाऱ्यांच्या भावनांचा विचार करा
^डॉ.पोखर्णायांची जिल्ह्याबाहेर बदली करावी; अन्यथा सर्व कर्मचारी उपोषण करतील. डॉ. पोखर्णा यांना येथे ठेवायचे असेल, तर सर्व कर्मचाऱ्यांची दुसरीकडे बदली करा, अशी टोकाची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. कारण पोखर्णा यांची वागणूक कर्मचाऱ्यांच्या सहन करण्यापलीकडची आहे. प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या भावनांचा विचार करून त्यांच्याबाबत निर्णय घ्यावा.'' इंदिरा डुलगच, उपाध्यक्षा, महिला कर्मचारी.
बातम्या आणखी आहेत...