आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैद्यकीय अधिकार्‍यांवर दोन दिवसांत कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- रुग्णांच्या आर्थिक पिळवणूकप्रकरणी जिल्हा रुग्णालय प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. चौकशी अधिकार्‍यांचा अहवाल येताच दोन दिवसांत कारवाई करण्यात येईल, असे प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पी. एस. कांबळे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना बुधवारी सांगितले.

अस्थिरोग विभागातील रुग्णांना बाहेरून उपचार साहित्य आणण्याचे सांगितले जात असल्याचा प्रकार ‘दिव्य मराठी’ने चव्हाट्यावर मांडल्यानंतर त्याचे पडसाद जिल्हा परिषदेच्या सभेतही उमटले.

डॉ. कांबळे म्हणाले, चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश डॉ. अंजली मोहोळकर यांना दिले आहेत. जिल्हा रुग्णालयासह सर्व ग्रामीण रुग्णालयांतील वैद्यकीय अधिकार्‍यांना औषधे बाहेरून आणण्याचा सल्ला देऊ नये, असे आदेश दिले. असा प्रकार आढळून आल्यास प्रशासकीय कारवाई करण्यात येईल.

वर्तमानपत्राला माहिती देणार्‍या रुग्णाला हाकलले नाही. उपचारांचा आमचा अहवाल चुकीचा असेल, तर संबंधितांवर कारवाई करू, असे डॉ. कांबळे यांनी सांगीत ले.

तक्रार निवारण अधिकारी नेमा
जिल्हा रुग्णालयातील तक्रारींमध्ये वाढ होत आहे, रुग्णांना सेवा देण्याची जबाबदारी तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांची आहे. परंतु, रुग्णांकडे दुर्लक्ष होत असेल तर ही बाब गंभीर आहे. रुग्णांच्या तक्रारीसाठी तक्रार निवारण केंद्र कार्यान्वीत करून तेथे अधिकारी नेमावा.’’ अँड. सुभाष पाटील, सदस्य.