आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परदेशी विद्यार्थिनींची स्नेहांकुरला भेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विदेशी विद्यार्थीनींनी स्‍नेहांकुरची माहिती घेतली.  छाया: कल्पक हतवळणे - Divya Marathi
विदेशी विद्यार्थीनींनी स्‍नेहांकुरची माहिती घेतली. छाया: कल्पक हतवळणे
नगर - अमेरिकेतील कोलोरॅडो स्टेट युनिव्हर्सिटीतील समाज कार्य अभ्यासक्रमातील विद्यार्थिनी त्यांच्या शिक्षिका भारतातील सामाजिक प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी नगरला आल्या आहेत. सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या विविध संस्थांना भेट देत आहेत.
फ्रँनी सोवसिक, केनजी बोहम, अलिस अराडिटो, क्रिस्ती बीची यांनी मंगळवारी स्नेहालय, स्नेहांकुर, कम्युनिटी रेडिओ केंद्र, तसेच हिम्मतग्राम पुनर्वसन केंद्राला भेट दिली. नको असलेले मूल अनेकदा टाकून दिले जाते. अशा बेवारस मुलांचे संगोपन स्नेहांकुर संस्थेत केले जाते.तेथील लहानग्यांना पाहताना अमेरिकेतील या युवतींना भारतातील महिला मुलांचे, तसेच या वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, तेथील कार्यकर्त्यांचे प्रश्न समजले. स्नेहालयाचे डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी त्यांना संस्थेच्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. अमेरिकेहून आलेल्या या युवती जामखेड येथील सर्वंकष ग्रामीण आरोग्य प्रकल्पालाही भेट देणार आहेत.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, विदेशी विद्यार्थिनींचे फोटो..