आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 जूनपासून सुरु होणाऱ्या शेतकरी संपाबाबत उद्या नगरमध्ये बैठक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- १ जूनपासून सुरु होणाऱ्या शेतकरी संपाच्या नियिजनासाठी, नगर येथील मार्केट यार्ड मध्ये मंगळवारी ३० मे दुपारी बारा वाजता नियोजन बैठक आयोजित केली अाहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली. 

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी शेतकऱ्यांच्या अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्रातील शेतकरी जूनपासून संपावर जाणार अाहेत. जिल्ह्यातील पुणतांबा येथून या संपाची घोषणा झाली आहे. संप यशस्वी करण्याची जबाबदारी नगर जिल्ह्यावर आहे. संपात कसा सहभाग घेता येइल, काय करायचे, काय नाही करायचे दूध भाजीपाला अडवण्याची ठिकाणे निश्चित करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...