आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुकानदारांच्या मालाने अडवले शहरातील रस्ते, अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहरातील अनेक रस्त्यांवर दुकानदारांनी आपले साहित्य माल बाहेर ठेवल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे. - Divya Marathi
शहरातील अनेक रस्त्यांवर दुकानदारांनी आपले साहित्य माल बाहेर ठेवल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे.
नगर - दुकानदार आपले साहित्य माल रस्त्याच्या कडेला मांडत असल्याने अाधीच अरुंद असलेले शहरातील रस्ते अधिक अरुंद झाले आहेत. दुकानांचे फलक, तसेच इतर साहित्य थेट रस्त्यावर मांडल्याने दुचाकीस्वार पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. महापालिकेचे या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष झाले आहे. दुकानदारांनी आपला माल रस्त्यावर मांडून वाहतूक कोंडी करू नये, अशी मागणी जागरूक नागरिक करत आहेत.
शहरातील अतिक्रमणांचा प्रश्न गंभीर झाला अाहे. या समस्येत विविध रस्त्यांवरील दुकानदार आणखी भर टाकत आहेत. सर्जेपुरा, कापडबाजार, माेचीगल्ली, नवीपेठ, चितळे रस्ता, कोठी रस्ता, दिल्ली दरवाजा, प्रोफसर कॉलनी अादी भागातील दुकानदार दुकानाचे फलक इतर साहित्य रस्त्याच्या कडेला मांडतात. त्यात भर टाकतात फेरीवाले बेशिस्तपणे पार्किंग केलेली दुचाकी वाहने. या गर्दी रस्त्यावरून जाताना अक्षरश: जीव गुदमरून जातो. दिल्ली दरवाजा येथून चितळे रस्तामार्गे कापडबाजारात जायचे असेल, तर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. पायी चालणारे असो की, दुचाकीस्वार रस्त्यावरून जाताना मोठी कसरत करावी लागते.

रस्त्यावर आधीच पुढे आलेली दुकाने, सकाळी दुकान उघडताच दुकानाचे फलक रस्त्यावर मांडण्याची चुकीची पध्दत शहरात सुरू झाली आहे. दुकानावर फलक असतानाही आणखी एक फलक रस्त्यावर मांडून हे दुकानदार नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करत आहेत. महापालिका प्रशासन प्रत्येक वेळी अतिक्रमण हटाव मोहीम राबवून फेरीवाल्यांवर कारवाई करते. परंतु रस्त्यावर फलक इतर साहित्य मांडणाऱ्या दुकानदारांवर कोणतीच कारवाई करत नाही. त्यामुळे दुकानांचे फलक इतर साहित्य रस्त्यावर मांडण्यासाठी चढाओढ सुरू असल्याचे सध्या चित्र आहे. दुकानदारच असे वागत असतील, नागरिक तरी कशाला नियम पाळतील. त्यामुळे दुकानदारांनी आपल्या दुकानासमोरील रस्त्यावर फलक इतर साहित्य ठेवून वाहतूकीची कोंडी करू नये, अशी मागणी शहरातील जागरूक नागरिक करत आहेत. दुकानदारांनी समंजस भूमिका घेतली, तर वाहतूक कोंडीचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास नक्कीच मदत होईल.
रस्ता शोधावा लागतो
शहरातील गजबजलेला कापड बाजार अन्य भागात दुचाकी उभी करण्यासाठी प्रत्येकाला मोठी कसरत करावी लागते. काही ठिकाणी जागा नसल्याने अथवा दुकानदारांच्या मालामुळे भर रस्त्यात दोन रांगा करून दुचाकी उभ्या कराव्या लागतात. अशा वेळी नागरिकांवर रस्त्यावरून जाताना अक्षरश: रस्त शोधण्याची वेळ येते.
साहित्य जप्त होणार का?
रस्त्याच्याकडेला फलक इतर साहित्य ठेवणाऱ्या दुकानदारांचे साहित्य जप्त केले, तर वाहतूक कोंडीची समस्या काही प्रमाणात सुटेल. महापालिका प्रशासनाने केवळ ठरावीक काळात अतिक्रमण हटाव मोहीम राबवता किमान एक दिवसाआड कारवाई केली पाहिजे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने स्वतंत्र पथकाची नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...