आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेटेंनी स्वार्थासाठी केला मराठ्यांचा विश्वासघात, महाडिक यांचा आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - विनायक मेटे यांनी मराठा समाजाच्या भावनांचे राजकारण करत राजकीय स्वार्थ साधला. मराठा समाजाचा विश्वासघात केल्याने त्यांनी शिवस्मारक समिती आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी अ. भा. मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजयसिंह महाडिक यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली. शासकीय विश्रामगृहावर आयोजित मराठा आरक्षण समितीच्या बैठकीनंतर ते बोलत होते.
या बैठकीला मराठा सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष कृषिराज टकलेंसह २०० कार्यकर्ते उपस्थित होते.
महाडिक म्हणाले, मेटे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा हातात घेत स्वत:चे कल्याण करुन घेतले. मंत्रिपदाचे डोहाळे लागल्यामुळे ते सत्ताधाऱ्यांपुढे हुजरेगिरी करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री फडणवीस यांचा २९ जुलैला औरंगाबाद दौरा आहे. मराठा आरक्षणासाठी एकत्र आलेल्या सर्व संघटना यावेळी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा न्यायालयीन लढाई लढण्याचे आवाहन त्यांना केले जाणार आहे, अशी माहितीही महाडिक यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
बातम्या आणखी आहेत...