आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परदेशी पाहुण्यांसंगे विद्यार्थ्यांनी धरला ठेका

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर: मॅक्सिकोहून आलेल्या पाहुण्यांसमवेत विद्यार्थ्यांनी नृत्याचा ठेका धरला. हे दृश्य होते तक्षिला शाळेतील. सांस्कृतिक आदान-प्रदान कार्यक्रमांतर्गत रोटरीच्या मॅक्सिको एस. ई. टीमच्या सदस्यांनी तक्षिला शाळेला भेट दिली.
आरतुरो वर्गास यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या पथकात एस्ट्रिला मेडेज, एफ्रिन पेरेज, अल्फान्सो सेरॅनो, आड्रियाना आयवाराडो यांचा समावेश होता. त्यांच्या समवेत रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष निर्मल गांधी, सचिव अमृत कटारिया, समन्वयक मनीष बोरा आदी होते. प्राचार्य संध्या व्यंकटेश यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
वर्गास यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना भारताचा व मॅक्सिकोचा ध्वज बहुतांशी सारखा असल्याचे सांगितले. आमच्या ध्वजावर अशोक चक्राऐवजी साप खाणारा गरूड आहे. वाईटावर चांगल्याचा विजय असा त्याचा अर्थ आहे, असे ते म्हणाले. नंतर त्यांनी गाणी म्हणून दाखवली, तसेच नृत्य केले. विद्यार्थीही त्यात सहभागी झाले. पाहुण्यांनी चित्रे काढून दाखवली, तसेच मैदानावर फुटबॉलचाही आनंद लुटला. उत्सवप्रिय भारत व मॅक्सिको हे मैत्री जपणारे देश असून या दौर्‍यामुळे दोन्ही संस्कृतीचा मिलाफ झाला आहे, अशी भावना पाहुण्यांनी व्यक्त केली.