आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोषण आहाराबाबत मुख्याध्यापक दक्ष हवेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - शालेय पोषण आहार योजना सक्षमपणे राबवणे आवश्यक आहे. बिहारमधील छपरासारख्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी मुख्याध्यापकांनी दक्ष राहिले पाहिजे, असे आवाहन महापालिकेचे उपायुक्त डॉ. महेश डोईफोडे यांनी केले.

मनपा शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक सभेत ते बोलत होते. शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी रावसाहेब मिरगणे, पर्यवेक्षक नूरमोहंमद पठाण, सतीश धाडगे यांच्यासह सर्व विषयतज्ज्ञ या वेळी उपस्थित होते. महापालिका स्तरावर शालेय पोषण आहार सनियंत्रण समितीची या वेळी स्थापना करण्यात आली. समितीमार्फत आयुक्त विजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नियमितपणे शाळांना भेटी देऊन पोषण आहारावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे, शाळांच्या विविध अडचणी सोडवण्यासाठीही समितीच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे डॉ. डोईफोडे यांनी सांगितले.

मिरगणे म्हणाले, शासनाच्या विविध परिपत्रकांच्या आधारे 24 घटकांचा समावेश असलेले सूचनापत्र प्रत्येक शाळेला देण्यात आले आहे. सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली तर कुठलीही दुर्घटना घडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.