आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एमआयडीसी’चे उद्योजकांना मुंबईचे निमंत्रण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर येथील एमआयडीसीतील भूखंड वाटपप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात लढाई हरलेल्या उद्योजकांना चर्चेसाठी मुंबईला बोलावण्यात आले आहे. शुक्रवारी या उद्योजकांनी एमआयडीसीचे व्यवस्थापक संजय सेठी यांची सुपे येथे भेट घेऊन त्यांच्यासमोर आपली बाजू मांडली.
एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी मोकळ्या जागांवर प्लॉट पाडून उद्योजकांना विकले. त्यावर उद्योजकांनी कारखानेही उभे केले. अधिकाऱ्यांच्या या गैरव्यवहाराचा फटका उद्योजकांना बसला आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर उद्योजकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे ते हवालदिल झाले आहेत. शंभराहून अधिक उद्योजकांनी शुक्रवारी सेठी यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपली बाजू मांडली. गटणे समिती अंतर्गत समितीने दिलेल्या अहवालात अनेक त्रुटी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे उद्योजकांना न्यायालयात बाजू मांडण्याची संधीच मिळाली नाही, असे त्यांनी सांगितले. सेठी यांनी या उद्योजकांना सप्टेंबर रोजी मुंबईतील अंधेरी येथे असलेल्या मुख्यालयात चर्चेसाठी बोलावले आहे. त्यावेळी उद्योजकांना तेथे आपली बाजू मांडता येईल. याशिवाय न्यायालयात पुनर्विचार याचिकेसाठी मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती उद्योजकांनी दिली.

यावेळी एमआयडीसीच्या विभागीय अधिकारी हेमांगी पाटील, आमी संघटनेचे अध्यक्ष अशोक सोनवणे, उद्योजक रवींद्र वायकोळे, राजेंद्र कटारिया, दिनेश अग्रवाल, प्रशांत मोहोळे, सुनील कानवडे, अरुण कुलकर्णी, मिलिंद कुलकर्णी, दिलीप कुलकर्णी, प्रसन्न कटारे आदी अनेक उद्योजक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...