आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमआयडीसीतील भूखंड परत करण्याचे आदेश, उच्च न्यायालयाचा निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर एमआयडीसीतील मोकळ्या जागांवर (ओपन स्पेस) पाडलेले १३८ भूखंड तीन महिन्यांत परत करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. भूखंडांच्या या गैरव्यवहाराबद्दल ‘दिव्य मराठी’ने वृत्तमालिका प्रकाशित केली होती. हे भूखंड वितरित करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या चौकशीचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.

मोकळ्या जागांवर प्लॉट पाडून ७, १०, १५ गुंठ्यांचे भूखंड उद्योजकांना वितरित करण्यात आले होते. हे करताना एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ कराळे यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती.
दरम्यान, हे भूखंड लहान असून ते घेणारे उद्योजकही ताकदीने तसे कमी आहेत. या भूखंडांवर उभारलेल्या उद्योगांत सध्या शेकडो कामगार काम करत आहेत. त्यामुळे सरकारने न्यायालयाचा आदेश पाहून त्यातून योग्य तो तोडगा काढावा, अशी अपेक्षा उद्योजक प्रमोद मोहोळे यांनी व्यक्त केली.
बातम्या आणखी आहेत...