आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशाच्या रक्षणासाठी लष्करी अधिकाऱ्यांनी सज्ज राहावे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - राष्ट्रीय एकता, अखंडता देशाच्या रक्षणासाठी लष्करी अधिकाऱ्यांनी सज्ज राहावे. एमआयआरसीच्या ‘वीरता और विश्वास’ या ब्रीदचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन लष्कराच्या दक्षिण विभागाचे जनरल कमांडिंग इन चिफ एमआयआरसीचे कर्नल ऑफ रेिजमेंट लेफ्टनंट जनरल पी. एम. हेरिज यांनी केले.
लष्करापुढील आव्हानांवर चर्चा करण्यासाठी नगरच्या मेकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंेटल सेंटरमध्ये (एमआयआरसी) २० २१ सप्टेंबरला लष्करी अधिकाऱ्यांची २० वी द्वैवार्षिक परिषद झाली. त्यानंतर एमआयआरसीतील डिसुझा थिएटरमध्ये झालेल्या सैनिक संमेलनात लेफ्टनंट जनरल हेरिज बोलत होते.

दर दोन वर्षांनी नगरमध्ये देशभरातील वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची परिषद होते. परिषदेच्या सुरुवातीला एमआयआरसीतील युद्धस्मारकावर लेफ्टनंट जनरल हेरिज यांनी पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी सर्व वरिष्ठ अधिकारी, एमआयआरसीमधील कमांड अधिकारी, तसेच सर्व सुभेदार मेजर अधिकाऱ्यांनी शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली.

या परिषदेत लेफ्टनंट जनरल हेरिज यांनी लष्करी सज्जतेचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या. तसेच, अिधकाऱ्यांना मार्गदर्शन केले. या परिषदेत मनोेबल बाढवणारे प्रशिक्षण, लष्करासमोरील नवनवीन आव्हाने, लष्करी कारवायांसाठी सज्जता, मोहिमांसाठी आवश्यक ती आधुनिक साधनसामग्री, या विषयांसह लष्कराच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यात आली.
या परिषदेनिमित्त हरपाल स्टेडियममध्ये कर्नल ऑफ रेजिमेंट आंतरबटालियन क्रॉस कंट्री चॅम्पियनशिप मैदानी स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात २१६ स्पर्धकांनी भाग घेतला. वीर सारथी या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सैनिकांचे विशेष संमेलन झाले. त्यात लेफ्टनंट जनरल यांनी उपस्थित सैनिकांना शिस्त कर्तव्य बजावण्यासाठी समर्पण भावनेने काम करण्याचे आवाहन केले. यावेळी सैिनकांना त्यांनी बजावलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल लेफ्टनंट जनरल हेरिज यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. या परिषदेसाठी एमआयआरसीचे कमांडट ब्रिगेडिअर व्ही. के. वर्मा जवानांनी परिश्रम घेतले.
नगरच्या मेकॅनाईज्ड रेजिमेंेटल सेंटर (एमआयआरसी) येथे २० २१ सप्टेंबरला लष्करी अिधकाऱ्यांची २० वी द्वैवार्षिक परिषद झाली. त्यात एमआयआरसीचे कर्नल ऑफ रेिजमेंट लेफ्टनंट जनरल पी. एम. हेरिज यांनी लष्करी अिधकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
बातम्या आणखी आहेत...