आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता दूधउत्पादकांनाही काढावा लागणार परवाना

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवळाली प्रवरा: सरकारने दूध भेसळीला आळा घालण्यासाठी सरकारने अन्न व औषध प्रशासन विभागाकडून दूधउत्पादक शेतकर्‍यांना परवाने काढण्याच्या सूचना केल्या आहेत. भेसळ करणार्‍यांना अधिकार्‍यांकडूनच अभय मिळते. मात्र, सर्वसामान्य दूधउत्पादक शेतकर्‍यांच्या पाठीमागे परवान्याचा ससेमिरा लावल्याने ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ असा प्रकार सरकारकडून होत असल्याची भावना शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.
राज्य सरकारने नुकतेच एका अध्यादेशाद्वारे अन्न व औषध प्रशासनाला दूधउत्पादक शेतकर्‍यांना दूधउत्पादनाचे परवाने काढण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याप्रमाणे अन्न व औषध प्रशासनाने दूध संकलन केंद्र (डेअरी) चालकांनी दूधउत्पादक शेतकर्‍यांना परवाने काढण्याचे आदेश दिले आहेत. दुधातील भेसळ रोखण्यासाठी हा सर्व प्रकार करण्यात येत आहे. परंतु दूधउत्पादक शेतकरी 5 ते 50 लिटर दूध डेअरीला पाठवतो. भेसळयुक्त दुधाची निर्मिती शेतकर्‍यांनी केली नसून ती दूध धंद्यातील काळ्या बोक्यांनी केली आहे. दूध भेसळीविरुद्ध कारवाई करताना प्रशासनाला डेअरीचालक व शीतकरण केंद्रचालक सापडले आहेत. अद्याप कोठेही दूधउत्पादक शेतकर्‍यांच्या विरोधात भेसळीची कारवाई झाली नाही.
दूध भेसळीला लगाम घालण्यासाठी प्रय} करूनही त्यास यश आलेले नाही. अलीकडेच झालेल्या पाहणीतून दुधात मोठय़ा प्रमाणावर भेसळ केली जात असल्याचे उघड झाले आहे. मात्र, तरीही मोठय़ा प्रमाणात भेसळीचे प्रकार होत आहेत. शेतकर्‍यांनी दूध व्यवसाय शेतीला जोडधंदा म्हणून स्वीकारला आहे. शेतकर्‍यांचे दूध डेअरीत त्याची घनता व लॅक्टोमीटर पाहूनच घेतले जाते व त्यानुसारच दुधाला भाव दिला जातो.
परवाना काढण्यासाठी किमान 600 ते 700 रुपये खर्च येतो. परवाने न काढल्यास कायद्याचा बडगा दाखवण्यात येत आहे. राहुरी तालुक्यात सुमारे 3 ते 4 हजार दूधउत्पादक असून, परवान्यापोटी सरकारला 28 लाख रुपये मिळतील.